शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Extension for scholarship : Backward class students can apply till september 30
शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत.ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरले नसलेल्या विद्यार्थ्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

मुंबई विभागातील विविध महाविद्यालयात सन २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असेही प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी कळविले आहे.


हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर, फडणवीस म्हणतात मला तसं चित्र दिसत नाही