घरताज्या घडामोडी'मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त', नारायण राणेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

‘मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त’, नारायण राणेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्रात आणि देशामध्ये २०२४ मध्ये शिवसेना दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहचली असेल आणि बरेच लोकं तेव्हा बेरोजगार झाले असतील असे संजय राऊत म्हणाले.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवेसना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप केला होता. यावर मी प्रखर राष्ट्रवादी असून राष्ट्रभक्त असल्याचे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी राणेंना दिलं आहे. राऊतांनी भाजपवर अनेक आरोप केले होते या आरोपांवर नारायण राणेंनी उत्तर दिलं आहे. तसेच संजय राऊतांना तुमचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा दिला आहे. तसेच राऊत राष्ट्रवादीकडून सुपारी घेऊन शिवसेनेला बदनाम करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंनी केलेल्या हल्लाबोलवर संजय राऊतांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी पद्धतशीर राणेंना उत्तर दिलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पलटवार केला आहे. राऊत म्हणाले की, मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच आहे, असे प्रत्युत्तर नारायण राणेंना राऊतांनी दिलं आहे. संजय राऊत यांचा डोळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. राऊतांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. राऊत संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. असा आरोप केला आहे. यावर राऊतांनी घणाघाती पलटवार केला.

- Advertisement -

दरम्यान आमचा आमचा कुठे डोळा नसतो फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये २०२४ मध्ये शिवसेना दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहचली असेल आणि बरेच लोकं तेव्हा बेरोजगार झाले असतील असे संजय राऊत म्हणाले.

विनायक राऊतांकडून जोरदार पद्धतीने शिवसेनेची भूमिका

संजय राऊत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊतांची पत्रकार परिषद एकली आहे. त्यांनी शिवालयात पत्रकार परिषद घेऊन जोरदार पद्धतीने शिवसेनेची भूमिका मांडली असल्याचे राऊत म्हणाले आहेत. दरम्यान विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांचा भूतकाळ पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ करत जनतेसमोर आणला आहे. सोमय्या किती मराठी द्वेष्ठ्ये आहेत याबाबत नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ विनायक राऊत यांनी दाखवला आहे. तर नारायण राणे यांच्या घोटाळ्यांबाबत सोमय्यांनी ईडीच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीचे काय झाले? असा सवालही विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊत यांना घाम फुटण्याचं कारण काय?; नारायण राणेंचा सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -