घरताज्या घडामोडीशिवसेना गोव्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार, काँग्रेसशी युतीबाबत संजय राऊत म्हणाले...

शिवसेना गोव्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार, काँग्रेसशी युतीबाबत संजय राऊत म्हणाले…

Subscribe

गोव्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पहिल्यांदात गोव्यात पक्षाचा उमेदवार देणार आहेत. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच शिवसेना देखील पूर्ण ताकदीने गोवा निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना- काँग्रेसची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत चर्चा सुरु असून सकारात्मक निर्णय़ झाला तर युती होईल अन्यथा शिवसेना स्वबळावर पूर्ण ताकदीने लढेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर संजय राऊत म्हणाले की, गोव्यातील काँग्रेस आणि शिवसेनाबाबतच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा सुरु आहे. माझी काँग्रेसमधील काही लोकांशी चर्चा सुरु आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशाप्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करायला लागते. ती प्रकिया तशी मोठी आहे. जर आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. पंरतु ते तयार झाले नाहीतर आम्ही गोव्यात २२ जागांवर स्वतंत्र लढू असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढवणार

आगामी वर्षातील गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. गोव्यात ४० जागांपैकी २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला कोणाच्या युतीची गरज नाही. जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी गोव्यात निवडणूक लढवू शकतात तर महाराष्ट्र का नाही. महाराष्ट्र बाजूलाच आहे. आमची मोर्चेबांधणी देखील उत्तम आहे. त्यामुळे गोव्याची निवडणूक पूर्ण ताकदीन लढणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात जे काम आम्ही केलं आहे ते त्यांनी पाहिले असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे.

मोदी पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हतं

कोणी कोणती स्वप्न पाहू नयेत असे नाही. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटत नव्हते. राजकारण अतिशय चंचल आहे. या देशातील लोकशाही अतिशय चंचल आहे आणि देशातील जनताही शहाणी आहे. विरोधकांच्या एकजुटीबाबत चर्चा सुरु आहे. या देशात विरोधकांची एकजूटता पर्याय म्हणून बनण्याची गरज आहे. विरोधकांची एकजूट करणं देशद्रोह नाही. आम्ही मोदींविरोधात षडयंत्र रचत नाही असे संजय राऊत म्हणाले. देशातील सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करताना असे वाटते की, सगळ्यांना सोबत आणून आपले मतभेद काही वेळ दूर करण्याचे काम एकच नेते करु शकतात आणि ते शरद पवार आहेत असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊतांविरोधात भाजप महिला मोर्चीची मानहानीची तक्रार, दिल्लीत FIR दाखल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -