घरताज्या घडामोडीSanjay Raut : छगन भुजबळांना उमेदवारी देणार कोण? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : छगन भुजबळांना उमेदवारी देणार कोण? संजय राऊतांचा सवाल

Subscribe

नाशिक लोकसभा मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांसह महायुतीच्या नेत्यांवर टीका केली.

मुंबई : नाशिक लोकसभा मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांसह महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लोकसभेच्या उमेदवारीसाठी तयारी सगळेच जण करतात. पण त्यांना ती जागा मिळाली पाहिजे. कारण अजित पवार त्यांना ती जागा देणार नाहीत, असे म्हणत संजय राऊतांनी छगन भुजबळांवर टीका केली. (sanjay raut slams chagan bhujbal and mahayuti government)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. “लोकसभेच्या उमेदवारीसाठी तयारी सगळेच जण करतात. पण त्यांना ती जागा मिळाली पाहिजे. कारण अजित पवार त्यांना ती जागा देणार नाहीत. कदाचित शरद पवार असते, तर त्यांना त्यांनी ती जागा मिळाली असती. पण दिल्लीचे त्यांचे गुजराती नेते आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे दिल्लीत गुजराती नेते भुजबळांना जागा द्यायची की नाही ते ठरवतील. एकनाथ शिंदेही त्यांना जागा देऊ शकत नाही”, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“पूर्वी महाराष्ट्रात जागावाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते. मात्र आता एकनाथ शिंदे, अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात त्याचा निर्णय घेतला. आम्हाला जागावाटपासाठी दिल्लीत जावं लागत नाही. आम्ही जागावाटप महाराष्ट्रात करतो. आम्ही मातोश्रीवर किंवा शरद पवारांच्या घरी चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं असून या राज्याचे नेतृत्व अजूनही ठाकरे-पवारांकडे आहे. त्यामुळे दिल्लीची गुलामी करावी लागत नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही. ब्रिटीश काळात किंवा मुघलांच्या काळात मांडलिक संस्थानिक यांचे जे महत्व होते. तेच महत्व या दोघांना महाराष्ट्रात आहे. स्वत:चे निर्णय घेण्याची कुवत, हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा दिल्लीत आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेलो त्यावेळी आपला अपमाना होतो आहे, तेव्हा त्यांना त्या दरबारातून शिवाजी महाराजांनी पाय काढला, संघर्ष केला आणि थेट महाराष्ट्रात आले. परंतू, या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावे लागते आणि येताना पार्श्वभागावर म्हणजेच पांढऱ्या कपड्यांवर त्यांच्या हिरवळीचे गवत घेऊन यावे लागते. अमित शहा किंवा जे. पी. नड्डा यांच्या लॉनमधील गवत त्यांच्या पार्श्वभूमीवर असते”, असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – KANGANA RANAUT : कंगना रणौतबाबत अपमानास्पद टिप्पणी; महिला आयोगाने घेतली दखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -