घरमहाराष्ट्रNana Patole: भिवंडी-सांगली आमच्या परंपरागत जागा; कोणीही दावा करू नये, पटोलेंचं सूचक...

Nana Patole: भिवंडी-सांगली आमच्या परंपरागत जागा; कोणीही दावा करू नये, पटोलेंचं सूचक विधान

Subscribe

मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात आचारसंहिता लागू झाली असली तरीही अद्याप राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी एक सूचक विधान केलं आहे. नाना पटोले म्हणाले की, सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. त्या जागांवर कोणीही दावा करू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये जाहीर केलेली उमेदवारी योग्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. (Loksabha 2024 Nana Patole Bhiwandi Sangali is our traditional place No one should claim Patole s suggestive statement)

नाना पटोलेंची जाहीर नाराजी

नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नको. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे अशा पद्धतीने नावं जाहीर करणं योग्य नाही, अशा शब्दांत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

राज्यात मविआ भाजपाला पराभूत करणार

नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत अनेक जागांवर सध्या चर्चा सुरू आहे. तसंच वंचितशी देखील चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच मविआमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं सांगत, भाजपाला राज्यात मविआ पराभूत करेल, असं वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

चंद्रपुरातील जागेवर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यावरही त्यांनी भाष्य केलं. धानोरकर यांनी भाषणादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये काही अलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. यावर पटोले म्हणाले, सर्व सुरळीत सुरू आहे. वडेट्टीवार हे लवकरच धानोकरांच्या प्रचाराला ही जातील.

- Advertisement -

(हेही वाचा: Nana Patole: भिवंडी-सांगली आमच्या परंपरागत जागा; कोणीही दावा करू नये, पटोलेंचं सूचक विधान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -