घरताज्या घडामोडीकाही नेते गांजा मारुन वक्तव्य करतात,त्यांची नार्को टेस्ट व्हायला हवी - संजय...

काही नेते गांजा मारुन वक्तव्य करतात,त्यांची नार्को टेस्ट व्हायला हवी – संजय राऊत

Subscribe

NCBने अशा बेताल बडबडणाऱ्या लोकांची टेस्ट करुन ते काही मारतात का किंवा त्यांना कोणी काही पुरवते का? हे पाहणे गरजेचे आहे

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) दादर नगर हवेली येथे पोटनिवडणूकीच्या (adra nagar haveli election) प्रचारानिमित्त गेले आहेत. राज्यसभेचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणूक होणार आहे. इथली पोटनिवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शिनसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दादरा नगर हवेतील मनमानी कारभाराविषयी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना विरोधी पक्षांवर चांगलाच हल्लाबोल केला.देशात आणि राज्यात सध्या गांज्याची शेती वाढली आहे. काही नेते गांजा मारुन वक्तव्य करतात. त्यांची नार्कोटिक टेस्ट व्हायला हवी. दसऱ्या मेळाव्यानंतर विरोधी पक्ष बेतालपणे बोलत आहे. त्या सगळ्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे. NCBने अशा बेताल बडबडणाऱ्या लोकांची टेस्ट करुन ते काही मारतात का किंवा त्यांना कोणी काही पुरवते का? हे पाहणे गरजेचे आहे,असे संजय राऊत म्हणाले.

राज्यसभेचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले लोकशाहीचे घटनात्मक संकेत पाळून पक्ष वाढवा आणि राज्य वाढवा. मात्र अशा प्रकारे लोकांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी त्यांना आत्महत्येच्या दारापर्यंत नेऊन ठेवता ही लोकशाही मी देशात प्रथमच पाहत आहे. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांचे उदाहरण देत संजय राऊत म्हणाले, तुम्ही आमच्या पक्षाचे नाही तर मी तुमच्या फाईलवर सही करणार नाही असे महाराष्ट्राचे राज्यपाल ठरवतात. ही एक नवीन प्रथा सुरू झाली आहे. हे नेते गांजा मारुन वक्तव्य करतात त्यामुळे त्यांची नार्कोटेस्ट होणे गरजेचे आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

- Advertisement -

प्रफ्फुल खेडा पटेल सारख्या माणसाला लोकांनी गुजरातमध्ये नाकारले त्या माणसाला दादरा नगर हवेली केंद्रशासित भागात प्रशासक म्हणून नेमण्यात आले. हे घटनाबाह्य आहे. प्रशासक ही जागा आयएस अधिकाऱ्याची जागा आहे. मात्र मनमानी आणि मस्तवाल पणा इथे पहायला मिळतो. केंद्रशासित विचारायला कोणी नाही. प्रश्न विचारणाऱ्या तुरुंगात टाकण्यात येते. मी कोणत्या राजकीय पक्षाचे काम करावे कोणती राजकीय विचारसरणी स्वीकारावी हा माझा अधिकार आहे. पण दादरा नगर हवेलीत प्रशासक या गोष्टी ठरवतात. विशिष्ट राजकीय पक्षांनी डेलकरांना छळ केला. त्या निराशेतून त्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र सरकारने एका एसआयटीची स्थापना केली असून ते या प्रकरणाचा तपास करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

डेलकरांच्या कुटुंबाला शिवसेनेकडून संरक्षण मिळत

मोहन डेलकर सात वेळा खासदार होते ९वेळा त्यांनी निवडणूका लढवल्या. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार आहेत. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला आपले खाते उघडवण्यासाठी या निवडणूकीच्या माध्यमातून मिळेल असे संजय राऊत यांनी म्हटले. डेलकरांच्या कुटुंबाला शिवसेनेत प्रवेश करावा लागला कारण त्यांना शिवसेनेकडून संरक्षण मिळत आहे. ज्या परिस्थिती त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्या परिस्थितीत त्यांना ज्या गोष्टींचा समाना करावा लागला त्या परिस्थितीत त्यांना शिवसेनेत यावेसे वाटले, असे देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -