फुटिरांना कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची टीका

shiv sena mp eknath shinde critisizes bjp modi govt and shinde group

एकीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केलेली असताना संजय राऊत यांनी या कार्यकारिणीवरच आक्षेप घेतला आहे. शिवसेनेतून फुटीर होऊन स्वतःचा गट स्थापन करणाऱ्यांना कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेत या नियुक्तीवर टीका केली. (Sanjay raut critisize to eknath shinde)

हेही वाचा – शिंदेंच्या गटाला सेनेच्या 12 खासदारांचा पाठिंबा?, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार

एक फुटीर गट पक्षाची कार्यकारिणी कशी बरखास्त करू शकतो आणि स्वतःची कार्यकारिणी जाहीर करू शकतो, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, आमदार पुन्हा फुटतील या भितीतून शिंदे गटाने घाई-घाईने ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षातून एक गट कसा काय कार्यकारिणी जाहीर करू शकतो, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात सध्या कॉमेडी एक्स्प्रेस २ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण गुवाहाटीत पाहिला, आता पार्ट टू आला आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मात्र, जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कम उभी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. काही आमदारांनी फटुून जाऊन गट स्थापन केला असेल, पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही. आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची धडपड सुरू आहे. शिवसेना हा मूळ पक्ष, त्यामुळे इतरांना अधिकार नाहीत, असं संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं.

हेही वाचा शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, रामदास कदम यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती

ते पुढे म्हणाले की, लोक नोकऱ्या बदलतात, मालक बदलतात तसं या लोकांनी मालक बदलले. आम्ही अजूनही सौम्यपणे जात आहोत. कायदेशीर लढाईत आमचा वेळ जातोय. पण उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर जे तुफान निर्माण होईल त्यापुढे कोणीही टीकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

देशाच्या संविधानावर हल्ला

या पत्रकार परिषदेत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकारिणीवर टीका केली. दोन तृतीयांशी लोक निघाले की त्यांना कोणत्यातरी पक्षात सामील व्हावं लागतं. ते बाहेर निघाले, पण त्यांना गटाची मान्यता नाही. त्यांचं कोणत्याही पक्षात विलिनीकरण झालं नाही. मग हे असंवैधानिक नाही का? असा सवाल उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. बाबासाहेब यांनी जे संविधान बनवलं त्यांच्या नियमांवरच हमला होत आहे. देशाच्या संविधानावर हमला होतोय. सत्ताधारी हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे, मग त्यांचीही जबाबदारी आहे, असंही सावंत म्हणाले.