घरमहाराष्ट्रSanjay Raut vs Dada Bhuse : दादा भुसेंवर ईडीची छापेमारी कधी? संजय...

Sanjay Raut vs Dada Bhuse : दादा भुसेंवर ईडीची छापेमारी कधी? संजय राऊत यांचा सवाल

Subscribe

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ED) पुणे आणि अहमदनगर व्हीआयपीएस (VIPS) ग्रुप ऑफ कंपनीजवर अलीकडेच छापेमारी केली. याचाच संदर्भ देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांच्यावर (Sanjay Raut vs Dada Bhuse) निशाणा साधला आहे. दादा भुसे यांच्याबद्दल मी सीबीआय आणि ईडीकडे रीतसर तक्रार केली आहे, त्यांच्यावर छापे कधी पडणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

- Advertisement -

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) उल्लंघनप्रकरणी ईडीने 25 मे रोजी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज तसेच ग्लोबल एफिलिएट बिझनेसवर छापमारी केली होती. विनोद खुटे आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडे या कंपन्यांचे व्यवस्थापन व नियंत्रण आहे. विनोद खुटे सध्या दुबईत राहत असून विविध बेकायदेशीर व्यवसाय, क्रिप्टो एक्स्चेंज, व्हीआयपीएस ग्रुपच्या माध्यमातून वॉलेट सेवांचा मास्टरमाईंड आहे. शिवाय, हवाला मार्गाने ही रक्कम विविध देशांमध्ये पाठवली जात होती, असा दावा ईडीने केला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर शरसंधान केले आहे. ईडीने पुणे-नगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुपवर छापे टाकले. या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये जमा केले आणि हवाला व्यवहारात वळवले. असेच प्रकरण गिरणा सहकारी साखर कारखान्याचे आहे. मंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बांधवांकडून 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशोब गायब आहे. मी सीबीआय आणि ईडीकडे रीतसर तक्रार केली आहे. त्यांच्यावर छापे कधी पडणार? असा सवाल करत शेतकऱ्याना हिशोब द्यावाच लागेल, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

काय आहे वाद?
मंत्री दादा भुसे यांनी Girna Agro नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाइटवर 47 सभासदांच्या नावावर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स दाखवले, असा दावा खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच केला आहे. त्यावर, Girna Agro कंपनीबाबतच्या आरोपांची चौकशी कोणत्याही यंत्रणेमार्फत करावी. दोषी आढळलो तर राजकारणातून निवृत्त होईन, असे प्रतिआव्हान दादा भुसे यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -