घरताज्या घडामोडीप्रताप सरनाईकांच्या पत्रातील एकच मुद्दा महत्त्वाचा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

प्रताप सरनाईकांच्या पत्रातील एकच मुद्दा महत्त्वाचा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Subscribe

शिवेसन नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी युती करण्याबाबत मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे सरनाईक यांनी म्हटलं आहे. सरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. परंतु या पत्रातील महत्त्वाचा मुद्दा विनाकारण देण्यात येणारा त्रास असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हा त्रास कोण कोणाला का देत आहे. या त्रासाबाबत सर्वांना अभ्यास करण्याची गरज असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवेसना नेते संजय राऊत यांना सरनाईक यांच्या पत्राबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. परंतु संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महापालिका निवडणूक आणि इतर गोष्टींबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की, विनाकारण त्रास दिला जात आहे. हा त्रास कोण कोणाला का देत आहे. याबाबत अभ्यास सुरु आहे. सरनाईक यांना त्रास दिला जात आहे आणि जर या त्रासाला कंटाळून हे पत्र लिहिले असेल तर तो विनाकारण त्रास काय असेल याचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

विनाकारण त्रास दिला जातोय

दरम्यान प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, विनाकारण त्रास दिला जात आहे. सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाला व शिवसोनेमुळे माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाई कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे , त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.

जिव्हाळा संपण्यापुर्वी निर्णय घ्या

राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -