घरमहाराष्ट्रसंजय शिरसाटांनी कार्यालयातील उद्धव ठाकरेंचा फोटो काढला, कारण...

संजय शिरसाटांनी कार्यालयातील उद्धव ठाकरेंचा फोटो काढला, कारण…

Subscribe

संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी याला सुरुवात केली आहे. सध्या आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहोत, त्यामुळे आम्ही त्यांचाच फोटो लावू अशी प्रतिक्रिया त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. 

एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्विकारून त्यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांनी आता आपल्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी याला सुरुवात केली आहे. सध्या आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहोत, त्यामुळे आम्ही त्यांचाच फोटो लावू अशी प्रतिक्रिया त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली.

संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या कार्यालयात आदित्य ठाकरे नव्हताच. उद्धव ठाकरेंचा होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे. राहिला प्रश्न शिवसेना प्रमुखांच्या फोटोचा, तर ते आमच्या हृदयस्थानी आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसेल आणि तो आयुष्यात कधीही तेथून हलणार नाही. कारण त्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मोठं केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळेच आम्ही मोठे आहोत.”

- Advertisement -

…तर त्यांचाही फोटो लावू

आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून तुम्ही रोजच आमची टेहाळणी करत असाल तर, आम्ही त्यांच्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे… आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं पाहून आम्ही त्यांना अपेक्षित धरायचं का? ज्यादिवशी ते चांगलं बोलायला लागतील, तेव्हा त्यांच्याही फोटो कार्यालयात लावण्यात येईल”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -