घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंजयभाऊ, एकवार सांगून टाका की तुमचं हिंदूत्व कोणतं?

संजयभाऊ, एकवार सांगून टाका की तुमचं हिंदूत्व कोणतं?

Subscribe

संजयभाऊ काल तुम्ही नाशिकला आलासा अन् आम्हाले खूप बरं वाटलं बघा, आम्ही तर लाडक्या विठुरायाचे वारकरी, आमच्यासोबत कोण येतो कोण जातो ते समदेच आम्हाला विठुरायागत वाटतात बघा, तसे तुमी बी आम्हासनी विठुरायागतच वाटले. तुम्ही घाई घाईत आलासा, अन तितक्याच घाईघाईत त्रंबकरायाच्या ज्योतिर्लिंग मंदिरातबि गेलास. अन तुमच्याबरोबर तुमचा फौजफाटा पाहून बी आम्हा वारकर्‍याले खूप आनंद वाटला. संजयभाऊ, तुम्ही एवढ्या दिवसाकाठी त्रंबक नगरीत आला आणि त्यातले त्यात निवृत्तीरायाच्याही दर्शनाले आलात.

वाटले तुम्हाला उराउरी भेटावे, पण तुम्हास्नी भेटून देतील ते तुमचेच मीडियावर कसले? आमच्या आगुदर तेच तुम्हाला भेटून मागच्याच उखाळ्या पाखळ्या काढू लागले, म्हणं, काही मुस्लिमांची पोर ज्योतिर्लिंग मंदिरले धूप दाखवत होते, त्याहीले तुम्ही काहून सांगत नाही की तो विषय आता मिटलाय म्हणून? तर तुम्हीच पुन्हा खरे हिंदुत्व कोणते? आमचे हिंदुत्व कोणते? हे त्यायले सांगून राहिले? या तुमच्या मीडियावीरांना विचारा की त्रंबकनगरीचे आणखी कोणते प्रश्न हाय ते? तुमचीच गाडी बघा ना किती अडचणीतून आली ते? राहू द्या आता ते.. जे झाले ते झाले. ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून तुम्ही थेट आमच्या वारकरी संतांच्या मांदियाळीत दाखल झालात. खरे तर तुम्ही काल असता तर निवृत्तीरायाच्या पालखीच्या प्रस्थानालाच तुमचे हात लागले असते. पण उशिरा का होईना तुम्ही आलात हे बरे केले बघा. संजू भाऊ तसे तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक वारसदार आहात. कोणत्याही धर्माची पगडी तुम्ही या ठिकाणी घातली नाही त्याचेही आम्हाला बरे वाटले हो..

- Advertisement -

पण आमची तुम्हास्नी एक विनंती हाय संजयभाऊ तुम्ही एकवार सांगूनच टाका की तुमचे हिंदुत्व कोणते आहे? बर्‍याचदा तुमचे उद्धवभाऊदेखील जाहीर सभेत सांगतात की आमचे हिंदुत्व वेगळं हाय म्हणून आता तुम्ही संतांच्या या मांदियाळीत आलासा तर तुम्हीच सांगून टाका की काय खरं हाय, काय अन् काय खोटं ते.

तसे या त्रंबकनगरीत आणि काही तुमचे राजकीय जोडीदार येऊन गेलेत हो. तेबी असंच काही बाही बोलून गेलेत, काहींनी तर खास कोकणातून येऊन इथे महाद्वारात महाआरती केली शंभूरायासमोर. आन बरं का संजू भाऊ, आम्हासनी त्याचं बी काही वाईट वाटलं नाही बघा. पण एक सांगा ना संजयभाऊ जो येतो तो आम्हाला उपदेश करतो बघा, अन आम्ही तर तसं तुम्हाला म्हणत नाही की आम्हाला तुम्ही काही सांगा म्हणून? उगं आपलं तुम्ही येतात आणि म्हणतात त्रंबकच्या नागरिकांनी एकोपा दाखवला, एकोपा दाखवला,

- Advertisement -

जाऊद्या संजयभाऊ आम्हास्नी ना जास्त बोलायची सवयच हाय बघा. निवृत्तीरायाच्या पालखीवर डोकं टेकवाया म्हणून तुम्ही आम्हाला तिथं बी ह्या पोलिसांनी आम्हाला तुमच्याकड काही सोडलं नाही बघा, शेती हे टिव्ही चैनलवाले भी काही बाहि काढून तुम्हाला बोलतच करता या बघा. अन तुम्ही बी मन घालून बोलतासा. एकेकाळचे तुमचे सहकारी आणि आमच्या नाशिकचे पालकमंत्री नेमके तुम्ही येणार तेव्हाच आले बघा.

खरंतर निवृत्ती रायाच्या पंढरपूरच्या प्रस्तानाच्या दिवशीच पालकमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं पण तेही आले नाहीत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या प्रश्नाला लागून तुम्ही स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी केली तेबी एक बरंच केलं बघा. पण, तुम्ही जे कायम हिंदुत्व तुमचं वेगळं म्हणताना त्या हिंदुत्वाची एकदा झलक दाखवून इथल्या समद्या लोकांना पुरोगामीपणाचे धडे द्या, ठाणच मांडा की दहा-पंधरा दिवस! सगळे नीटच करून टाका म्हणतो मी. आता तुम्ही आषाढीवारीला निरोप द्यायला आला तवा पुढल्या येळला बी या. आम्ही तुमची वाट बघू.

– राजेंद्र भांड, नाशिक, तुमचा एक वारकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -