घरताज्या घडामोडीशिक्षकांमुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला, शिक्षकदिनी पंकजा मुंडेंनी सांगितल्या शाळेतल्या...

शिक्षकांमुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला, शिक्षकदिनी पंकजा मुंडेंनी सांगितल्या शाळेतल्या आठवणी

Subscribe

राज्यात गणोशोत्सवासोबत जागतिक शिक्षक दिन साजरा केला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या शाळेतील शिक्षक नानासाहेब कवडे यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. शिक्षकांमुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

गुरुजींना मला घडविण्यासाठी छडी देखील मारली आहे. मी उंच असल्यामुळे सर्वात शेवटी शाळेत बसायचे. माझे राजकीय गुरू गोपीनाथ मुंडे आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अमित शाह यांना राजकारणातलं अधिक कळतं. त्यांना मोठा कॉमन सेन्स आहे. त्यांच्याबद्दल मी बोलावं इतकी मी मोठी नाही. अमित शाहांच्या मिशन 150च्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आम्ही सर्व टीम मिळून तो आकडा पार करणार आहोत, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

आमच्या दसरा मेळाव्याला अनेक माणसं येत असतात. आमचा वंचितांचा मेळावा असतो. मला जे स्थान आहे ते लोकांच्या अपेक्षा मधलं आहे. त्यामुळे हे महत्वाचे जास्त स्थान आहे. मला लोकांचं प्रेम भरभरून मिळत असल्यामुळे मी जास्त समाधानी आहे, असं मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूचा धोका, मृत्यूची संख्या १५ पार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -