घरताज्या घडामोडीCoronavirus in School: कर्नाटकात एकाच शाळेत ९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाकडून शाळा...

Coronavirus in School: कर्नाटकात एकाच शाळेत ९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाकडून शाळा सील

Subscribe

दुसऱ्या लाटेत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. परंतु दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. यामुळे सर्वच राज्य सरकारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु केल्या होत्या. महाराष्ट्रातही शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु कर्नाटकमध्ये एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. एकाच शाळेतील ९० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्या शाळेतील १० कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालात स्पष्ट झालं आहे. या कोरोनाबाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

कर्नाटकमधील चिकमंगळूरू जिल्ह्यातील एका शाळेत ९० विद्यार्थ्यांना कोरोनाबाधित आढळले आहेत. सीगोडूमधील जवाहर नवोदय शाळेतील ४५७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामधील ६९ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये ५९ विद्यार्थी आणि १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या ६९ जणांचा कोरोना अहवाल शनिवारी आला होता. यानंतर आणखी २१ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ही १०१ झाली आहे.

- Advertisement -

एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शाळा सील करुन ७ दिवसांकरता बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचा धोका असताना शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरायला लागला आहे. नांजप्पा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स महाविद्यालयात रविवारी २९ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण वसतीगृह सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव 

महाराष्ट्रात पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला आहे. यानंतर एक पुण्याला तर आता मुंबईतही कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता १० वर गेली आहे. महाराष्ट्रात अद्याप शालेय विद्यार्थ्यांमध्ये कोरोना पसरल्याची घटना घडली नाही आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेल्या जिल्ह्यांमध्येच शाळा सुरु करण्यात आल्या असल्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.


हेही वाचा :  छत्रपतींचा रायगड हे तर तीर्थक्षेत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -