घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : गरीब मुली शोधण्यासाठी मिळायचे १० हजार; आरोपी महिलेने...

शोध बेपत्ता मुलींचा : गरीब मुली शोधण्यासाठी मिळायचे १० हजार; आरोपी महिलेने काय सांगितले?

Subscribe

नाशिक : अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणानंतर ओझर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवले. पोलिसांनी ओझरमधील एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिने गरीब मुली शोधण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये मिळायचे. तसेच, चांगले कपडे, नोकरी, मोबाईलचे आमिष दाखवून १० ते १७ वयोगटातील मुलींचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री केली जाते, अशी धक्कादायक माहिती महिला आरोपीने पोलिसांना दिली होती. यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर येताच ओझर पोलिसांनी वेगाने तपास मध्यप्रदेशातून दोन मुलींची सुटका केली.

ओझर येथे सहा महिन्यांपूर्वी एक चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. नाशिक पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानुसार एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहिती घेतली असता शहर परिसरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याचे समजले. मुलींचे अपहरण करणार्‍या टोळीमध्ये ओझरमधील महिलेचाच समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांकडून या ऑपरेशनला मुस्कान असे नाव दिले होते.

- Advertisement -

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चार पुरुष व एक महिला पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पथकातील पोलीस कारने शिरपूरला गेलेे. संशयित तीन महिलेकडे मुलींबाबत चौकशी केली असता तिने मुली बडोद्याला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस संशयित तीन महिलांसह बडोद्याला गेले. मात्र, या ठिकाणी मुली नव्हत्या. पोलीस अंमलदार अनुपम जाधव यांनी मुलींना परत घेऊन जायचे, त्याशिवाय महाराष्ट्रात जायचे नाहीच, असे सहकारी पोलिसांना सांगितले. त्यास चौघांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, पोलिसांना मुलींचे लोकेशन मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस कोठेही न थांबता तातडीने खरगनमध्ये पोहोचले. यावेळी गावकर्‍यांनी पोलिसांना दमदाटी केली. मात्र, पोलिसांनी मुलींची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी ओझर येथून एक महिला, धुळ्याहून दोन महिला व मध्यप्रदेशातील दोघांना पोलिसांनी अटक केली. ओझर येथील महिलेने संबंधित मुलीला पाऊणेदोन लाख रुपयांत विकल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई किशोर अहिरराव, अनुपम जाधव, रावसाहेब मोरे, जितेंद्र बागूल, राजेंद्र डंबाळे, उज्ज्वला पानसरे यांनी केली.

आधी पैसे द्या मग मुलींना घेऊन जा

 मध्यप्रदेशात संशयित महिलांनी मुलींना विकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मुली असलेल्या त्या घरात प्रवेश केला. गावकर्‍यांना पोलिसांची चाहूल लागली. गावातील महिला व पुरुषांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आधी पैसे द्या मग मुलींना घेऊन जा, असे त्या घरातील माणसांनी सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून मध्यप्रदेशातील पोलीस पळून गेले. तितक्यात महिला पोलिसाच्या मदतीने मुलीला ताब्यात घेतले. त्यावेळी गावकर्‍यांनी हल्ला केला. अनेकांनी कारवर दगडफेक केली. शेवटी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. तितक्यात मध्यप्रदेश पोलीस आले. त्यांच्या मदतीने मुलींना घेऊन सुखरूप बाहेर पडलो. त्यानंतर खरगनहून रातोरात ओझरला आलो, असे पोलीस अंमलदार अनुपम जाधव यांनी सांगितले.

- Advertisement -
ऑपरेशनमधील पोलिसांचा व्हावा सन्मान

मुस्कान ऑपरेशनमधील चार पुरुष व एक महिला पोलिसाने मध्यप्रदेशात अनोळखी ठिकाणी गावकरी हल्ला करत असतानाही मुलींची सुटका केली. या पोलिसांचा सरकार, पोलीस दलासह समाजाने सन्मान होणे गरजेचे आहे. त्यातून पोलिसांचा हुरुप वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -