घरमहाराष्ट्रजनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरु; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरु; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यापासून जनेतची दिशाभूल करण्याचं काम सुरु असल्याचं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आसपासचे लोक सैरभैर झाले आहेत. त्यांच्याकडे असलेले आमदार आणि कार्यकर्ते यांना आपल्याकडे ठेवण्यासाठी निकालाचे चुकीचे विश्लेषण कालपासून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यापासून जनेतची दिशाभूल करण्याचं काम सुरु असल्याचं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.सहा याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आल्या होत्या, त्या फेटाळण्यात आल्या आहेत, असं पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.  ( The work of misleading the public has started Shrikant Shinde targets Uddhav Thackeray )

तसंच, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला कायदेशीर म्हटलं आहे आणि राजकीय पत्र कोणता शिंदे गट की ठाकरे गट तसचं, व्हीप कोणाचा लागू होणार याबाबीतील सर्व निर्णय अध्यक्षांना घ्यायला सांगितले आहेत, असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

- Advertisement -

शिवसेनेसोबत येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी चुकीचे नरेटिव्ह सेट केले जात असल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे सहानुभुती मिळवण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत आहेत, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विरोधकांकडे सध्या काही काम राहिलेले नाही. ते घरी बसून काहीही बोलत आहेत.

 ठाकरेंच्या आमदारांनी राजीनामा द्यावा

ठाकरे गटाला निवडणुकीची फार घाई झालेली आहे. निवडणुका या ज्या वेळेला व्हायच्या आहेत तेव्हा होईल.उद्धव ठाकरे हे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या १४-१५ आमदारांना राजीनामा द्यायला सांगावे जे भाजप आणि शिवसेनेच्या जोरावर निवडून  आले आणि मग निवडणुकीला सामारे जावे, असे खासदार शिंदे म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: “बाळासाहेब ठाकरे हे लढणारे नेते तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका )

नैतिकता असती तर  वडिलांचे विचार जोपासले असते

पत्रकार परिषदेत आमदार संजय  शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरसाट म्हणाले की, नैतिकतेची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत मी 25 वर्षे काम केलं आहे. इतकीच नैतिकता असती तर त्यांनी बाळासाहेबांचे विचार जोपासले असते. शिवसैनिक वाढवलं असतं. खुर्चीसाठी लाचारी पत्करली नसती. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला नाही, तर लाजेपोटी दिल्याचंही शिरसाट यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -