“बाळासाहेब ठाकरे हे लढणारे नेते तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

"उद्धव ठाकरे हे विकासावर कधी बोलत नाहीत. मग, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील विकासावर बोलले नाहीत आणि आता विरोधी पक्षात असूनही ते विकासावर काही चर्चा करत नाहीत", असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.

मुंबई | “बाळासाहेब ठाकरे हे लढणारे नेते होते, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत”, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिला आहे. “देशाची आणि महाराष्ट्राची बदनामी ज्या गद्दारांमुळे होत आहे, अशांना पाठिंबा देण्याचे त्यांनी थांबवले पाहिजे”, अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परीषदेततून केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे लढणारे नेते होते, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे आता रडोबा झाले आहेत. उद्धव ठाकरे हे रणांगणातून पळून गेले होते. ज्या दिवशी आमदार-खासदार त्यांना सोडून गेले, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा पराभव झाला. आता रडोबाचे राजकारण चालत नाही, त्यांनी विकास होत नाहीत. ज्यांच्या रक्तात विकास, दूरदष्टी, पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही.”

हेही वाचा – Maharashtra Political Crisis : राज्यपालांची भूमिका घृणास्पद, उद्धव ठाकरेंची जहरी टीका

विकासावर कधीच बोलत नाही

“उद्धव ठाकरेंनी थोडे आत्मपरीक्षण करावे. लयास गेलेला पक्ष कसा चांगला होईल, यांची त्यांनी काळजी करावी. दररोज रटाळवाने आणि रडणाऱ्यांचा लोकांना कंटाळला आहे. उद्धव ठाकरे हे विकासावर कधी बोलत नाहीत. मग, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील विकासावर बोलले नाहीत आणि आता विरोधी पक्षात असूनही ते विकासावर काही चर्चा करत नाहीत. नुसते राजकारण सुरू आहेत, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र विकासावर थोडे लक्ष द्यावे”, असे मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केले आहे.