अदानी समूहाच्या प्रकरणावर ‘सेबी’ची प्रतिक्रिया; ‘हे’ निवेदन जारी

गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याच चढ-उतारीवरून आता भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठं वक्तव्य केले आहे.

Gautam Adani

गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याच चढ-उतारीवरून आता भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठं वक्तव्य केले आहे. ‘मागील आठवडाभरात एका व्यावसायिक समूहाच्या वैयक्तिक समभागांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झालेत. त्यामुळे आम्ही बाजाराची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी, बाजारांना पारदर्शकता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत’, असे सेबीने म्हटले. (securities and exchange board of india clarified its position after adani groups shares collapsed)

अमेरिकास्थित हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुदाचे शेअर्स कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सेबीने पाळलेल्या मौनामुळे विरोधकांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. मात्र आता सेबीने एक निवेदन जारी करत प्रकरणावरील भूमिका स्पष्ट केली आहे.

सेबीच्या निवेदनात काय?

मागील आठवड्यापासून एका व्यावसायिक समूहाच्या शेअर्सच्या किमतीत चढ-उतार दिसत आहे. बाजाराचे कार्यक्षम कामकाज राखण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असून शेअर्समधील अस्थिरता दूर करण्यासाठी उपाय करणे आवश्यक असल्याचे सेबीने म्हटले. सेबीने जारी केलेल्या या निवेदनात अदानी समुहाचे नाव घेण्यात आलेले नाही.

दरम्यान, काही तासांपूर्वीच अदानी समुहाच्या शेअर्सच्या पडझडीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भूमिका जाहीर केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) शुक्रवारी शेअर बाजारातील गोंधळाच्या चिंतेमध्ये भारताचे बँकिंग क्षेत्र मजबूत आणि स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ‘नियामक आणि पर्यवेक्षक म्हणून आरबीआय आर्थिक स्थिरता राखण्यासाठी बँकिंग क्षेत्र आणि प्रत्येक बँकेवर सतत नजर ठेवून आहे. आरबीआयकडे मोठ्या कर्जाशी संबंधित माहितीचे केंद्रीय भांडार (CRILC) डेटाबेस प्रणाली आहे. जिथे बँका त्यांच्या कर्जाची पाच कोटी आणि त्याहून अधिक रकमेची नोंद करतात, ही माहिती देखरेखीसाठी वापरली जाते’, असे स्पष्टीकरण आरबीआयकडून देण्यात आले होते.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान