घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"तडजोडीच्या राजकारणापेक्षा स्वाभिमानाने 'एक्जिट' घेईल" : पंकजा मुंडे

“तडजोडीच्या राजकारणापेक्षा स्वाभिमानाने ‘एक्जिट’ घेईल” : पंकजा मुंडे

Subscribe

नाशिक : मुंडे साहेबांचा राजकारणातील समृद्ध वारसा चालवताना ज्या गोष्टी मनात ठेवून मी राजकारणात आले, त्या जनतेसाठी करण्याची मुभा मिळत नसेल तर असे तडजोडीचे राजकारण मला कदापि मान्य नाही. त्यापेक्षा स्वाभिमानाने राजकारण सोडेन, असा इशारा देत माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची भीती वाटत नसल्याचे मत मांडले.

असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल या संघटनेतर्फे रविवारी (दि.8) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांच्या हस्ते युवकांना राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर आव्हाड होते.

- Advertisement -

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, अ‍ॅड. के. के. घुगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, पालिका स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते, उदय सांगळे उपस्थित होते. याप्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात काही मिळवण्यासाठी कुणापुढेही झुकणार नाही. राजकारणात अनेक गोष्टी अजूनही करायच्या बाकी आहेत. त्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे. ज्या गोष्टी सार्वजनिकरित्या बोलता येत नाहीत, त्या लिहून ठेवते. जीवनात आजवर आलेले अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले, असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स ही माणसे घडविण्याचे काम करत आहे. ज्यांना आज पुरस्कार मिळाला, ती त्यांच्या कार्याची पावती आहे.

विलास बढे यांनी पंकजा मुंडे यांची प्रकट मुलाखत घेतली. हेमंत धात्रक, उदय सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. वुई प्रोफेशनल्सचे अध्यक्ष उदय घुगे यांनी प्रास्ताविक केले. वुई प्रोफेशनल्सचे उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड, सचिव नीलेश ढाकणे, खजिनदार अविनाश आव्हाड, सचिव वैभव आव्हाड, अशोक कुटे उपस्थित होते.

- Advertisement -
यांचा झाला सन्मान

प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वकील म्हणून अ‍ॅड. अरविंद आव्हाड, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विजय घुगे, औद्योगिक क्षेत्रातील पुरस्कार भरत गीते यांना देण्यात आला. तसेच, कृषी उद्योगामधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार सत्यजीत व अजिंक्य हंगे यांना प्रदान करण्यात आला. श्रावणी सांगळे (क्रीडा), विलास बढे (पत्रकार), राहुल कराड (शैक्षणिक) तर, आश्लेषा शेळके हिला विद्यार्थी प्रकारात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -