घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समितीच्या उत्पन्नात गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा ४ कोटी ९६ लाखांनी वाढ

बाजार समितीच्या उत्पन्नात गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा ४ कोटी ९६ लाखांनी वाढ

Subscribe

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२१ मध्ये ११ कोटी ९३ हजार 9९० रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा एप्रिल ते डिसेंबर २०२२ या महिन्यात १४ कोटी ३९ लाख १० हजार ४०३ उत्पन्न हाती आले. अर्थात, गेल्यावर्षाच्या तुलनेत बाजार समितीच्या उत्पन्नात तब्बल ४ कोटी ९६ लाख ७३ हजार ३४४ रुपयांची वाढ झाल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांनी दिली.

नाशिक मुख्य मार्केटयार्डात गाळ्यांच्या उत्पन्नात २४ लाख १५ हजार ६४१ रुपयांनी वाढ झाली. तर, पेठरोड मार्केटयार्डात १५ लाख ११ हजार ८३४ रुपयांनी वाढ झाली. इतर ५१ लाख २८ हजार ९०६ रुपये उत्पन्न झाले आहे. फ्रूट मार्केटमध्ये प्रतिदिन वसुलीत वाढ झाली आहे. तसेच, मुख्य मार्केटयार्डाच्या प्रवेशद्वारावर होणारी बाजार शुल्काची वसुलीदेखील वाढली आहे. एफसीआयकडे थकीत असलेली बाजार फी ४१ लाख ३६ हजार ६०४ रुपये पत्रव्यवहार करत वसूल केली.
पेठरोड येथील पक्के गाळे तसेच पंचवटी मार्केटयार्ड येथील पक्के व पत्र्यांचे गाळे यांचे थकीत असलेले भाडे वसूल करण्यासाठी कर्मचार्‍यांना आदेश करण्यात आलेले आहेत. बाजार समितीच्या खर्चात कपात करत १ कोटी ६६ लाख ५६ हजार ३० रुपये करण्यात आलेली आहे. अनावश्यक खर्चावर आळा घातला असून, कर्मचारी पगार, स्वच्छता, सुरक्षा या व्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च केला जात नसल्याचे मुलानी यांनी सांगितले.

- Advertisement -
शासकीय देणी देखील दिली

प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कृषी पणन मंडळाची बाजार समितीकडे असलेली मागील थकीत असलेली अंशदानाची सुमारे ६३ लाख ९९ हजार ९२३ रुपये व चालू अंशदान ८१ लाख २३३ रुपये अशी एकूण १ कोटी ४५ लाख १५६ रुपये पणन मंडळास अदा केली आहे. तसेच, शासकीय शुल्कापोटी ६१ लाख ६९ हजार ९२० रुपये, टीडीएस रक्कम ८१ हजार रुपये असे एकूण २ कोटी ७० लाख ७९ हजार २३६ रुपये शासनास अदा करण्यात आले आहेत.

करार संपुष्टात आल्याने सिक्युरिटी खर्चात कपात

बाजार समितीची सिक्युरिटी एजन्सीचा कालावधी डिसेंबर-२०२२ मध्ये संपुष्टात आल्याने ही सिक्युरिटी सेवादेखील बंद केली आहे. बाजार समितीमध्ये कार्यरत असलेले शिपाई व पहारेकरी यांच्या कामकाजाचे नियोजन करुन त्यांच्याकडून कामे करुन घेतली आणि दरमहा सिक्युरिटीवर होणारा एकूण खर्च ७ लाख ७२ हजार ३१० रुपये इतका कमी केला. २०२३ च्या अखेरीस ९२ लाख ६७ हजार ७२० रुपये बचत झाली.

- Advertisement -
मागील वर्षी होता कोरोना

मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी बाजार समिती उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी २०२१ मध्ये एप्रिल, मे, जून यादरम्यान कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. अनेक लोक मृत्यूमुखी पडत होते. या काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न कमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -