घरताज्या घडामोडीSelu Municipal Corporation : सेलूत राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षासह २० नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Selu Municipal Corporation : सेलूत राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षासह २० नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

काँग्रेसमध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु काँग्रेसनं पुन्हा राष्ट्रवादीच्या सदस्यांना काँग्रेसमध्ये ओढून आणलं आहे.

काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या यामुळे वाढली आहे. सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह एकूण २० नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सेलूत काँग्रेसने निवडणुकीपूर्व जबर धक्का दिला आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे.

सेलु नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह २० नगरसेवकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. मालेगावची काँग्रेसकडून परतफेड केली आहे. सेलु नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती परंतु आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. आगामाी पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली संघटना स्थानिक पातळीवर मजबूत करण्यावर भर देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मेगा भरती सुरु असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी सेलूत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता परंतु पुन्हा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु काँग्रेसनं पुन्हा राष्ट्रवादीच्या सदस्यांना काँग्रेसमध्ये ओढून आणलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेना, महाविकास आघाडी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार, भुंकायचे तेवढं भुंका; राऊतांचा विरोधकांना इशारा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -