घरठाणेज्येष्ठ नागरिकांना पाहिजे लोकलमध्ये आरक्षित डबा

ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे लोकलमध्ये आरक्षित डबा

Subscribe

शहापूर : तुडुंब गर्दीत असंख्य प्रवाशांना घेऊन धावणारी मुंबईची वाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमधून अर्थात लोकल मधून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. आज कालच्या तरुणाईला देखील गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना जेष्ठ नागरिकांना मात्र लोकल मधून प्रवास करणे अशक्यप्राय झाले आहे. या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिकांचा प्रवास सुखदायी व्हावा यासाठी लोकल मधील एक संपूर्ण डब्बा कायमस्वरूपी आरक्षित करावा अशी मागणी करण्यात येत आहे. वासींद येथील जेष्ठ नागरिक किसन चौधरी यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

रेल्वे प्रशासनाने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी अनेक रेल्वेस्थानकात सरकते जिने व लिफ्टची सुविधा केली आहे. मात्र लोकलच्या प्रचंड गर्दीत गुदमरायला होणे, धक्काबुक्की सहन करीत किंवा दरवाजाला लोंबकळत अगदी जीव मुठीत धरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. तर वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना प्रवास करणे अशक्यप्राय झाले आहे. प्रचंड गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा तर सोडाच ते लोकलमध्ये ना चढू शकत.. ना उतरू शकत अशी स्थिती लोकल प्रवासाची आहे. त्यामुळे लोकलचा प्रवास जेष्ठ नागरिकांच्या प्राणावरही बेतू शकतो.

- Advertisement -

या भीतीदायक प्रवासामुळे जेष्ठ नागरिक लोकलचा प्रवास नापसंत करतात. जेष्ठ नागरीकांसाठी महामंडळाच्या बसेस हा वाहतुकीचा पर्याय असला तरी आर्थिक व शारीरिकदृष्ट्या हा पर्याय परवडत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो. रेल्वे प्रशासनाने जेष्ठ नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सर्वच लोकल मध्ये मध्यभागी एक पूर्ण डब्बा आरक्षित करावा. तसेच लोकल मध्ये चढणे व उतरणे सोयीचे व्हावे यासाठी ‘ जेष्ठ नागरिकांसाठी ‘ अशा इंडिकेटर्सच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी भारतीय ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने किसन चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.


हेही वाचा : ३०० रिक्षाचालकांनी केली सुरक्षित वाहन चालविण्याची शपथग्रहण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -