Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खळबळजनक: नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीला गळती

खळबळजनक: नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीला गळती

कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला लागली गळती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर हा अक्सिजन अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा अक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने घबराहट पसरली आहे.

- Advertisement -

१३० रुग्ण हॉस्पिटलमध्ये;१५ रुग्ण व्हेंटिलेटरवर
काही रुग्णांना बिटको हॉस्पिटलला स्थलांतरीत करण्याचे काम सुरु

- Advertisement -