घरमहाराष्ट्रपुणेSerum Institute of India (SII) : सीरम इन्स्टिट्यूटला मुंबई हायकोर्टाचा दिलासा; बदनामीकारक...

Serum Institute of India (SII) : सीरम इन्स्टिट्यूटला मुंबई हायकोर्टाचा दिलासा; बदनामीकारक पोस्ट करण्यास मनाई

Subscribe

 

मुंबईः Serum Institute of India (SII) व त्यांच्या कर्मचाऱ्यांची बदनामी होईल, असा मजकूर प्रसारीत करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दोन कंपन्यांना मनाई केली आहे. त्यामुळे SII ला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

SII ने Yohan Tengra यांच्या Anarchy for Freedom India व Ambar Koir यांच्या Awaken India Movement या कंपन्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला. न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या न्यायालयाने या कंपन्यांना SII ची बदनामी होईल असा मजकूर प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. याआधी काही आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला असल्यास तो काढून टाकावा, असे आदेशही न्यायालयाने या कंपन्यांना दिले आहेत.

Parinam Associates मार्फत SII ने ही याचिका केली आहे. SII च्या काही कायदेशीर बाबी आहेत. याची माहिती या कंपन्यांच्या संकेतस्थळावर आहे. ही माहिती चुकीची आहे. या कंपन्यांचे संकेतस्थळ कोणीही बघू शकते. त्यासाठी कोणतेही निर्भंध नाहीत. आम्ही बनवलेल्या Covishield लसीच्या side effects मुळे शकडोंचा बळी गेला, असा दावा या कंपन्यांच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. यामुळे SII आणि कंपनीचे प्रमुख Adar Poonawala यांची बदनामी होत आहे. त्यांना लक्ष केलं जात आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचाः Ajit Pawar: एकेकाच्या कानशिलात लगावीन, पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांना दादांनी झापलं

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने तातडीने यावर कोणतेही आदेश देण्यास नकार दिला होता. संपूर्ण प्रकरण ऐकून मगच योग्य ते आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. नंतर या कंपन्यांनी  SII चा दावा फेटाळून लावला होता. तसेच ही याचिकाही फेटाळण्याची मागणी केली होती.

कोविशिल्ड लसीमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी

कोरोनाविरोधी लसीकरण आणि फंगस इंफेक्शन संदर्भात भारतात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे अभ्यास करण्यात आले होते. यात लसीकरणासंदर्भात देशातील १२ राज्यांतील १९ रुग्णालयांमध्ये झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांपेक्षा कोव्हिशील्ड लस घेतलेल्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण सर्वाधिक होते. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि झारखंडमधील ६ रुग्णालये आणि स्वतंत्र आरोग्य तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार, कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी प्रभावी आहेत. परंतु कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड घेणाऱ्या नागरिकांमध्ये अँडीबॉडीचे प्रमाण जास्त होते. या अभ्यासासाठी देशातील ५१५ आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. यातील ९० कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे दोन डोस देण्यात आले, तर काहींना कोव्हिशील्ड लस देण्यात आली. या दोन्ही गटातील कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणानंतर अँटीबॉडी तयार झाली. परंतु कोव्हिशील्ड घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण ९८ टक्के आणि कोवॅक्सिन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण ८० टक्के होते.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -