Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Ajit Pawar: एकेकाच्या कानशिलात लगावीन, पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांना दादांनी झापलं

Ajit Pawar: एकेकाच्या कानशिलात लगावीन, पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांना दादांनी झापलं

Subscribe

पुण्यातील (Pune) मुळशी तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी खडसावले आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळे अजित पवारांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कानशिलात लगावण्याचा इशारा दिला आहे.

मुळशी तालुक्यातील माजी नगरसेवक सुनील चांदरे आणि बाबा कंदारे यांचा एका लग्नात टोकाचा वाद पेटला होता. याची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली होती. हाच प्रसंग लक्षात घेता आज पदाधिकारी बैठकीत अजित पवार यांनी थेट पद दिलेल्या पदाधिकाऱ्यांना काम करा, नाहीतर एकेकांच्या कानाखाली वाजवील, असा थेट इशारा दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

- Advertisement -

राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन पूर्ण होऊन आपण २५ व्या वर्धापन दिनामध्ये प्रवेश करत आहे. याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मुळशी येथील सगळे पदाधिकारी आले आहेत. मुळशीच्या लोकांनी पण काम करायचे आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिलेली आहेत, म्हणून भांडायचं नाही. नाहीतर एक एकांचा कानाखाली आवाज काढीन. याच्यातून तुमची नाही आमची बदनामी होते. पवार साहेबांची बदनामी होते, अशा शब्दांत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

अशा घटना अजिबात घडता कामा नयेत

एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही राष्ट्रवादी संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्या पदावर बसता. त्यातच तुम्ही काही भानगड केली तर लोकं याचे व्हिडीओ बनवतात. त्यामुळे केलेल्या कामाचा सत्यानाश होतो. केलेल्या कामावर पानी फिरवता, अशा घटना अजिबात घडता कामा नयेत, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यापक समाजहिताचे राजकारण केले. तेच राष्ट्रवादीला अभिप्रेत आहे. भविष्यात सत्ताकारणात नवे चेहरे देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतत लावून धरली पाहिजे, असे आदेशही पवारांनी दिले.


हेही वाचा : Wrestlers Protest : कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांची घेतली भेट, बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी


 

- Advertisment -