घरताज्या घडामोडीसीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे पुनावाला यांचं मोठं योगदान, शरद पवार यांच्याकडून कौतुक

सीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे पुनावाला यांचं मोठं योगदान, शरद पवार यांच्याकडून कौतुक

Subscribe

सीरम इन्स्टिट्यूटने ज्या पद्धतीचं काम केलं आहे. अशी संस्था जागतिक पातळीवर काम करताना कमी प्रमाणात दिसते. सीरम ही इन्स्टिट्यूट संस्था पुण्यामध्ये आहे. सीरम संपूर्ण भारतामध्ये व्हॅक्सिनचा पुरवठा करण्याचं काम ज्यापद्धतीने करत आहे. तसंच काम जर्मनी सुद्धा करत आहे. अजून एका देशामध्ये अशाच प्रकारची कामं सुरू आहेत. अशा प्रकारच्या संस्था नागरिकांना सेवा पुरवण्याचं काम करत असतात. जगातील पाच पैकी तीन मुलं ज्याप्रकारे व्हॅक्सिन घेतात. त्यापद्धतीचं काम येथे सुरू आहे. अशाच अनेक प्रकारची व्हॅक्सिन जी सीरम इन्स्टिट्यूटने बनवली आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे पुनावाला यांचं मोठं योगदान

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट भाष्य करत त्यांचं कौतुक केलं. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही भेट दिल्यावर अमेरिकेतल्या उत्कृष्ट संस्थेमध्ये भेट दिल्यासारखं वाटतं. त्यांच काम हे उत्तर प्रकारचं आहे. त्याहीपेक्षा तेथील शास्त्रज्ञांची काम सुद्दा वेगळ्या पद्धतीने करताना पहायला मिळतं. सीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे पुनावाला यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली. अशी सर्वोत्कृष्ट निवड कधीच करण्यात आली नव्हती. तसेच संस्थेचे सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो.

- Advertisement -

तुमच्या भाषणामध्ये शाहू आणि फुले यांचा देखील उल्लेख केला जातो. अशा प्रकारची चिठ्ठी कोणीतरी पाठवली. परंतु यावर उत्तर देताना मी सांगितलं की, महात्मा फुले आणि सावित्री फुले म्हटल्यानंतर आपल्या मनात स्त्री शिक्षण आणि शिक्षणाची साधने येतात. परंतु मला त्यांचा दुसरा दृष्टीकोन मला अधिक आवडतो. तो म्हणजे इंग्लंडचा राजा हा भारतात येणार होता. त्याची बोट ही मुंबईला येणार होती. इंडिया गेटवर त्याच स्वागत केलं जाणार होतं. त्या स्वागतासाठी अनेक अधिकारी होते. परंतु त्यांच्याच बाजूला एक शेतकरी व्यक्ती सुद्दा उभा होता. त्याच्या हातात निवेदनाचा एक कागद होता. राजा बोटीतून उतरला आणि सर्वांना बाजूला केलं. परंतु त्याची नजर त्या शेतकऱ्यावर गेली कारण त्याच्या हातात कागद दिसत होता. त्यानंतर त्याने निवेदनाची प्रत त्या राजाला दिली. ती व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होय. त्या निवेदन पत्रातून त्यांनी तीन मागण्या केल्या होत्या. असं देखील शरद पवार यांनी सांगितलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -