महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्तीमागे राजकारण नाही – शरद पवार

sharad pawar

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचं समजलं जात आहे. भारतीय कुस्तिगीर महासंघाने ही मोठी कारवाई केली आहे. ३० जून रोजी दि्ल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय झाला. यावेळी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्तीमागे कोणतेही राजकारण नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्तीमागे कोणतेही राजकारण नाहीये. देशातील, राज्यातील अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे मी कायम अशा संघटनांच्या कामांचे दोन भाग करतो. एक भाग खेळ, खेळाडूंबाबत आणि दुसरा भाग क्रीडा संस्थेच्या प्रशासनाबाबत आहे. परंतु मी त्यांच्या अंतर्गत गोष्टीत कोणत्याही प्रकाराचा हस्तक्षेप केला नाही, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे आयोजन करणे हे माझे काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेवर गेलो होते. क्रीडा संघटनांना मैदान मिळणे कठीण असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे काम आहे, असं शरद पवार म्हणाले.

अनेक खेळाडूंना वैद्यकीय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितले आहे. कोणत्याही राज्यातील कुस्तिगीर परिषदेबाबत तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तिगीर संघटनेला टाळता येत नाही. या कारवाईच्या आधी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण मागण्यात आले नव्हते. पण मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : सहकाराच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा, नाना पटोलेंचे आवाहन