घरताज्या घडामोडी११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल

११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल

Subscribe

शिवसेनेचे बंडखोर आमदार ११ दिवसानंतर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. आता ते विशेष बसने ताज प्रेसिडंटकडे रवाना होणार आहेत. मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडंटपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करून दिलेलं नाही.

- Advertisement -

विमानतळावरून जवळपास १ तासाचं हे अंतर आहे. परंतु यादरम्यानचा संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला असून हे अंतर कमी वेळेत कापण्यास त्यांना मदत होणार आहे. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सर्व कर्मचारी गस्त आणि राऊंडअपवर आहेत. त्यासाठी मुंबईत एअरपोर्ट ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेल ताजमध्ये दाखल झाले आहे. शिंदे गटातील आमदार ताज हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच थोड्याच वेळात भाजप आणि शिंदे गटात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्तीमागे राजकारण नाही – शरद पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -