घरमहाराष्ट्रशरद पवारांचा 'चान्स' हुकला; म्हणून मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल पीएम - आठवले

शरद पवारांचा ‘चान्स’ हुकला; म्हणून मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल पीएम – आठवले

Subscribe

काँग्रेस सत्तेत असताना शरद पवार यांचा पंतप्रधान पदी नंबर लागला असता, आता यापुढे कधी त्यांचा नंबर लागेल, असे मला अजिबात वाटत नाही. तेव्हा शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले. त्यामुळे त्याचा पंतप्रधान होण्याचा ‘चान्स’ हुकला, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चित्रपटांविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ते अॅक्सिडेंटल पंतप्रधान झाले या मताशी मी सहमत असून ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत. परंतु त्यांनी नेता म्हणून कधी काम केलेले नाही, त्यावेळी मी काँग्रेस सोबत होतो. अध्यक्ष सोनिया गांधी यांना म्हणालो तुम्ही पंतप्रधान पद स्वीकारले पाहिजे. आपणच पंतप्रधान व्हा, जर आपण होत नसाल तर शरद पवार यांना प्रधानमंत्री केले पाहिजे, अशी त्यावेळी माझी भूमिका होती, असे केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.

- Advertisement -

हे वाचा – शिवस्मारकाला सर्वोच्च न्यायालयाचा ‘खो’!!

पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, त्यावेळी शरद पवार यांचा नंबर लागला असता. आता पुढे कधी त्यांचा नंबर लागेल, असे मला अजिबात वाटत नाही. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले, त्यांचा चान्स हुकला आहे. सोनिया गांधी यांना पंतप्रधान व्हायचे नव्हते आणि शरद पवार यांना पंतप्रधान करायचे नव्हते. म्हणून अचानक मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळे मी अॅक्सिडेंटल पंतप्रधान चित्रपटाशी सहमत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – नयनतारा सहगल प्रकरणावरून गडकरींचा सरकारला घरचा आहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -