घरताज्या घडामोडी... म्हणून सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मलिकांच्या आरोपावरून पवारांची टीका

… म्हणून सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मलिकांच्या आरोपावरून पवारांची टीका

Subscribe

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

पुण्यात शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या ४० जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांना नियुक्त केलं होतं. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितली. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्यानं ही घटना घडली. तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्याचंही ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती. पण त्यांनी न बोलण्यासाठी त्यांना सागितले. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

आज शेतकरी अडचणीत आहे. दहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी मेळाव्याला गेले. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. निसर्ग आपल्या हातात नाही पण संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणं सरकारची जबाबदारी आहे, असंही शरद पवार म्हणाले.

सत्यपाल मलिकांचे आरोप काय?

- Advertisement -

पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाही ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.

पुलवामा घटनेनंतर मी मोदींशी संवाद साधला असता त्यांनी गप्प राहण्यास सांगितल्याचे मलिक म्हणाले. तसंच, अजित डोवाल यांनी देखील मला गप्प राहण्यास सांगितलं. या हल्ल्याचं बोट पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा सरकारला निवडणुकीत होईल, असं सरकारचं धोरण होतं, असा गौप्यस्फोट देखील मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : मोदी सरकारच्या चुकीमुळे ‘पुलवामा हल्ला’; सत्यपाल मलिकांचं खळबळजनक वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -