घरनवी मुंबई'त्या' ११ जणांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू, मृतांचा आकडा १३ वर

‘त्या’ ११ जणांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू, मृतांचा आकडा १३ वर

Subscribe

याबाबत आता पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी आणखी नवी माहिती दिली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची संख्या आता वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे मृत पावलेल्या श्री सदस्यांची संख्या आता १३ वर पोहोचलेली आहे. अशात आता या घटनेबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आलाय. उष्माघात झालेले ११ श्री सदस्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मयत झाले होते, अशी माहिती पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाकेंनी दिलीय.

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो लोक आले होते. उन्हाचा पारा वाढलेला असतानाच हा कार्यक्रम पार पडला. सकाळी 10 वाजेपासून लोकांनी गर्दी केली होती. दुपारी 1.30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. या सर्वांवर कामोठे येथे एम जी एम तसेच नवी मुंबईतील टाटा रुग्णालय आणि डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: “राजकीय स्वार्थासाठी…”; राज ठाकरेंची राज्य सरकारवर खडसून टीका

याबाबत आता पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी आणखी नवी माहिती दिली आहे. कामोठेतील एमजीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू झालाय. उष्माघातामुळे आतापर्यंत एकूण १३ श्री सदस्यांचा मृत्यू झालाय. गुलाब पाटील असं या श्री सदस्याचं नाव असून ते विरार इथे राहणारे होते. यातील ११ श्री सदस्य हे रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्यापूर्वीच मृत पावले होते. एमजीएम रुग्णालयात एकूण १८ श्री सदस्य उपचार घेत होते. यात तीन महिला श्री सदस्यांचा समावेश आहे. तीन श्री सदस्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. उर्वरित ७ जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्जार्ज देखील देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात एका जनावराचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मरण पावलेले श्रीसदस्य कोण आहेत?

या घटनेवरून आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. विरोधकांना मात्र टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळालं आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. यापाठोपाठ दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी ट्वीट करून आणि नंतर प्रत्यक्ष रूग्णालयात जाऊन रूग्णांची चौकशी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -