घरमहाराष्ट्रपवारांच्या राजीनाम्यामागे राष्ट्रवादीतील फुटीचं कारण? जयंत पाटलांच मोठं वक्तव्य

पवारांच्या राजीनाम्यामागे राष्ट्रवादीतील फुटीचं कारण? जयंत पाटलांच मोठं वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या वाटेवर होता म्हणून पवारांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात राजकारणात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी पवारांच्या या निर्णयाचा विरोध केला. शरद पवार यांनीच  अध्यक्षपदी राहावं अशी मागणी त्यांनी लावून धरली, त्यानंतर आता अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने एकमताने पवारांचा राजीनामा फेटाळला. आता यावर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.( Sharad pawar resignation from President post Of NCP because of Party split Jayant Patil big statement )

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या वाटेवर होता म्हणून पवारांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांसाठीच धक्कादायक होता. पवारांनीच अध्यक्षपदावर राहावं असं आम्हा सर्वांचच मत आहे, असं पाटील यावेळी म्हणाले ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. शरद पवार यांच्या निर्णयावर देशभरातून अनेक नेत्यांचे फोन आले, त्यांनी निर्णय मागे घ्यावा अशीच मागणी केली गेल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

पक्षात फूट या वावड्या

पक्षांतर्गत फूट होण्याच्या सर्व बातम्या या वावड्या आहेत. आमचा राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे, याचं दु:ख काही जणांना आहे म्हणूनच ते अशा वावड्या उठवतात, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अजित पवार भाजपात जाण्यच्या चर्चांवर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार असा काही निर्णय घेणार नाहीत, ते आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहेत. मागची 24 वर्षे आम्ही एकत्रित काम करत आहोत. हा पक्ष वाढावा यासाठी पक्षातले कार्यकर्ते, सहकारी जबाबदारीने वागतात.

( हेही वाचा: अजित पवारांसमोर घोषणाबाजी करत कार्यकर्ते म्हणाले, अध्यक्षपदी… )

ठरावावेळी अजित पवारांचं मत काय? 

समितीने अध्यक्षपदाचा पवारांचा राजीनामा फेटाळताना अजित पवार यांचं मत काय होतं? यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, अजित पवारांचही राजीनामा मंजूर न करण्याचंच  मत होतं. त्यांनी आणि सर्वांनीच एकमताने राजीनामा फेटाळला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -