घरताज्या घडामोडीशरद पवारांचा भाजपविरोधी पक्षनेत्यांना झटका, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत म्हणाले...

शरद पवारांचा भाजपविरोधी पक्षनेत्यांना झटका, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु शरद पवारांनी स्पष्टीकरण देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये नसून उमेदवारी देणार नाही. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या प्रतिक्रियेमुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये आपण उमेदवार नाही असे शरद पवारांनी स्पष्ट सांगितले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार उमेदवार असतील अशी चर्चा सुरु होती. परंतु पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष उमेदवाराच्या नावांची चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु शरद पवारांनी स्पष्टीकरण देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये नसून उमेदवारी देणार नाही. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवारांच्या नावाची देशात आणि दिल्लीत चर्चा सुरु आहे. भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी आणि एकजूट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शरद पवार या आघाडीचे नेतृत्व करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु शरद पवारांनी याला विरोध केला आहे.

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादीकडून गुलाम नबी आझाद यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. विरोधकांकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. १५ जून रोजी विरोधकांनी दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जूनला काढण्यात येणार आहे. २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होऊन, २१ जुलैलाजी मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडे ४८.९ टक्के मते असून, बहुमतासाठी आणखी १३ हजार मतांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्ष एकजूट झाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते.


हेही वाचा : ममता बॅनर्जींनी बोलावली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार चर्चा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -