घरमहाराष्ट्रशरद पवार यांनी ३७० कलमाबद्दल भूमिका स्पष्ट करावी - विनोद तावडे

शरद पवार यांनी ३७० कलमाबद्दल भूमिका स्पष्ट करावी – विनोद तावडे

Subscribe

दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहिजे असे वाटत आहे, त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज केला.

घटनेचे कलम ३७० व कलम ३५ ए बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण कलम ३७० जर तसेच ठेवले तर कश्मीर प्रश्न तसाच राहतो, पण जर कलम ३७० काढले तर काश्मीर प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते. दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहिजे असे वाटत आहे, त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज केला. विरोधकांनी एकत्र येऊन जे काही तोडके मोडके महागठबंधन तयार केले आहे, त्याचीही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे सांगताना तावडे म्हणाले.

काय म्हणाले तावडे

“विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावे लागेल, अशाप्रकारचे वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू असे येचुरी बोलत आहेत, कदाचित शरद पवारांना आधीच कळले होते म्हणुन ते निवडणुक लढले नाहीत. निवडणुकीमध्ये पैसे हे काँग्रेसचे मुख्य हत्यार आहे, परंतु सध्या त्यांचे पैसे अडकले असल्यामुळे त्यामुळे कॉंग्रेस अस्वस्थ असावी, असे मत व्यक्त करताना तावडे म्हणाले की, निवडणुकांच्या काळातील कॉग्रेसच्या हालचालींची माहिती आयटीला कळल्यामुळे त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली असेल. निवडणूक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर आय. टी मध्ये काही चुकीच नसेल तर मग घाबरण्याचे काही कारणच नाही.”, असे तावडे म्हणाले.

- Advertisement -

“ज्यावेळी एनडीए स्थापना झाली, त्यावेळी एनडीए मध्ये विविध पक्ष होते. त्यावेळी एनडीए मध्ये असणाऱ्या फारुक अब्दुला यांनी भाजप आणि अन्य मित्र पक्षाचा मिनिमम प्रोग्रॅम मान्य केला होता, असे सांगताना तावडे म्हणाले की, शरद पवार यांना आता गांधी कुटुंबाचे बलिदान व त्याग दिसत आहे, पण त्यांनी जेव्हां दोन वेळा कॉंग्रेस सोडली तेव्हां ते कॉंग्रेस बद्दल काय बोलले होते ते अद्याप जनता विसरलेली नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए मध्ये असलेल्या फारुक अब्दुलांची भूमिका तुम्हाला आज आठवत असेल तर कॉंग्रेस सोडताना तुम्ही कॉंग्रेसवर केलेली टीकाही तुम्हाला आठवायला हवी. फारुक अब्दुला आता एनडीएमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांची भूमिका ही सध्याची आहे. ज्याप्रमाणे तुमची भूमिका बदलली त्याचप्रमाणे त्यांचीही भूमिका बदलली असावी.”,असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -