घरताज्या घडामोडीनाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू, शरद पवार यांच्या कानपिचक्या

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू, शरद पवार यांच्या कानपिचक्या

Subscribe

जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो. - शरद पवार

महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुसपूस असल्याच्या चर्चा मागील काही कालावधीपासून सुरु आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच पाठीत सुरा खुपसत असल्याचे वक्तव्य केलं होत. याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीमध्ये नक्कीच सारं काही अलबेलं नसल्याचे या वक्तव्यावरुन दिसत आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांना नाना पटोलेंच्या वक्तव्याबाबत प्रश्न केला होता आहे. यावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे की, या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत. त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो. असा खोचक टोला शरद पवार यांना नाना पटोले यांना लगावला आहे.

- Advertisement -

प्रत्येकाला आपल पक्ष वाढवण्याची इच्छा

काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देण्यात येतो याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष वाढवण्याचा प्रयत्नात असतो. काँग्रेसच्या भूमिकेत काही चुकीचं नाही. सरकार एकत्र चालवत आहोत म्हणजे पक्ष एकत्र चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याची इच्छा असेल यामुळे त्यात काहीही चुकीचं नाही. तसेच गैरसमजही असण्याची गरज नाही फक्त सरकार एकमताने आहे की नाही हे महत्त्वाचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच

विधानसभा अध्यक्षपदावरुन राज्यात चर्चा सुरु आहे. यंदाचे पावसाळी अधिवेश तालिका सदस्या भास्कर जाधव यांनी गाजवल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्याबाबत एकमत झालं आहे. परंतु हे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे यामुळे हे शिवसेनेकडे जाणार का अशी चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीमध्ये निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असून काँग्रेसकडे राहणार आहे. काँग्रेसचा अध्यक्ष मान्य असून त्या निर्णयावरच आम्ही कायम असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -