घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबिर, शरद पवार करणार...

राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि 5 नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबिर, शरद पवार करणार मार्गदर्शन

Subscribe

ठाणे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा” या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

आजवरच्या 23 वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेमध्ये राहिला. शरद पवार यांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रांतील विचारवंत, अभ्यासक, कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकार आदी मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले.

- Advertisement -

महागाई आकाशाला भिडली
आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. 2014 पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करु लागले आहेत. बेरोजगारीच्या संकटाने अक्राळविक्राळ स्वरुप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -