घरमहाराष्ट्रशरद पवार यांची ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट, केली पाहणी

शरद पवार यांची ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट, केली पाहणी

Subscribe

शरद पवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेली कोव्हीशिल्ड लस आणि तिचा साठा सुरक्षित असल्याबाबत समाधान व्यक्त केले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस बनविणाऱ्या पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी आग लागून रोटावायरस औषधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, या आगीत पाच मजुरांचाही होरपळून मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री ‘सीरम’ला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ, नीलम गोऱ्हे यांनीही भेट देऊन ‘सीरम’मध्ये पाहणी केली होती. आता घटनेच्या तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी शरद पवार यांनी आगीच्या घटनेबाबत आणि झालेल्या नुकसानीबाबत तसेच कामगारांच्या मृत्यूबाबतची माहिती तेथील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेतली. यावेळी ‘सीरम’चे अदर पुनावाला यांच्यासह इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेली कोव्हीशिल्ड लस आणि तिचा साठा सुरक्षित असल्याबाबत समाधान व्यक्त केले आणि कामगारांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संहसंवेदना व्यक्त केली.

- Advertisement -

‘सीरम’मधील ज्या इमारतीला गुरुवारी आग लालगी, त्या इमारतीत बीसीजी लस निर्मितीचे काम केले जात होते. त्यामुळ त्यासाठी लागणाऱ्या औषधांचे या आगीत नुकसान झाले. पण सुदैवाने कोविडच्या लसीचे केंद्र आग लागलेल्या इमारतीपासून लांब असल्याने ती लस आणि तिचा साठा सुरक्षित राहिल्याची माहिती यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -