घरमहाराष्ट्रउमेश कोल्हे हत्या प्रकरण : उद्धव ठाकरेंच्या फोनची होणार चौकशी, शंभूराज देसाईंची घोषणा

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : उद्धव ठाकरेंच्या फोनची होणार चौकशी, शंभूराज देसाईंची घोषणा

Subscribe

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. आमदार रवी राणा यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सुचनेद्वारे याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली, हे हत्याकांड झाले त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचा दावा राणा यांनी केली, यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल अशी घोषणा केली आहे.

रवी राणांनी उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप 

उमेश कोल्हे हत्याकांड हे 33 महिन्याच्या सरकारच्या काळात झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उमेश कोल्हे हिंदू विचारल होते, ते हिंदू विचारांचा प्रचार, प्रसार करत होते. नुपूर शर्मा त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली, त्याबाबत त्यांना अनेकदा धमक्या आल्या, धमक्यांनंतरही अमरावतीचे सीपी आरती सिंग यांनी कुठल्याही प्रकारे त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. जेव्हा भर चौकात त्यांची हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून जबरी चोरी आणि हत्येमध्ये कनवर्ट करण्यात आला.

- Advertisement -

त्यावेळी या प्रकरणी राज्याचे तत्कालीन मंत्री यांना फोन आला की, हा सगळा तपास रॅबरीच्या दिशेने करा आणि दाबा. यावेळी प्रकरणाची दिशा जेव्हा बदलली, त्यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून विनंती केली, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही केस दाबण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यावेळी एनआयएचे चौकशी लावली, असही रवी राणा म्हणाले.

एसआयटीमार्फत उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी झाली पाहिजे 

एनआयएच्या चौकशीसाठी टीम जेव्हा अमरावतीमध्ये आली तेव्हा लक्षात आलं , नुपूर शर्माच्यां हिंदूबद्दलच्या पोस्टचे समर्थन केले म्हणून उमेश कोल्हे यांची हत्या झाली. या हत्येला दाबण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांना विनंती आहे की, या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या फोनचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी विधानसभेत केली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा पर्दाफाश झाला पाहिजे

सभागृहात आदित्य ठाकरे नाहीत पण त्यांना माझं सांगण आहे की, काँग्रेसच्या सांगण्यावरून हिंदूं विचारांच्या लोकांना दाबत असाल, हिंदू विचारांना कोण पाठींबा देत असेल त्यांना जमीनदोस्त करत असाल तर हे हिंदू विचारांचे सरकार आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, ज्यातून उद्धव ठाकरेंचा पर्दाफाश झाला पाहिजे, सीपी आरती सिंग यांचे निलंबन झाले पाहिजे तसेच उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची राज्य गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी 

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाईल, राणा यांच्या आक्षेप पोलीस आयुक्त आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. यासंपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून विस्तृत अहवाल पंधरा दिवसांच्या आत मागवला जाईल, याप्रकरणी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहवाल सादर करणार आहे, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मांडलेले मुद्दे टाकून तयार करणार आहे, अशी माहिती आज शंभूराज देसाईंनी सभागृहात दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -