घरमहाराष्ट्रAlibaug Boat Competition : शिडाच्या होडी स्पर्धेत 'कमलावती'ची बाजी

Alibaug Boat Competition : शिडाच्या होडी स्पर्धेत ‘कमलावती’ची बाजी

Subscribe

अलिबाग तालुक्यातील कुंडलिका खाडीत आज (१० एप्रिल) शिडाच्या होड्यांची स्पर्धा रंगली. शेकडो होड्यांमुळे समुद्रातील विहंगम दृष्य सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडत होता.

अलिबाग : आग्रावमधील दर्यासागर मित्रमंडळ पूर्वापाडा आयोजित शिडाच्या होडीच्या स्पर्धेत कोर्लईच्या संजय पाटील यांच्या ‘कमलावती’ या होडीने बाजी मारली आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी एकविरा आईला नवसाचे नारळ देण्याची परंपरा आहे. या निमित्ताने शिडाच्या होड्यांची स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा आजही अलिबाग तालुक्यातील आकर्षण मानली जाते.

या निमित्ताने शेकडो कोळी-आगरी बांधव पाहुण्यांसह आवर्जून येतात. त्यांच्या नटवलेल्या होड्यांमध्ये बेन्जोपथक आणि नाचगाण्याचा जल्लोष पाहायला मिळतो. आजच्या (10 एप्रिल) स्पर्धेत खाडीत पाहावे तिकडे शिड्याच्या होड्या दिसत होत्या. हे दृष्य खूप विहंगम होते.

- Advertisement -

हेही वाचा… Khopoli School fee hike : खोपोलीजवळील शाळेत तब्बल 30 ते 40 टक्के फीवाढ

कुंडलिका खाडीत दर्यासागर मित्रमंडळ पूर्वापाडा दरवर्षी शिडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करते. दुपारी साडेबाराच्या सुमारास होणारी स्पर्धा पाहण्यासाठी आणइ त्याचा आनंद घेण्यासाठी अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक लोक हौसेने येतात. यंदा प्रथम क्रमांकास 70 हजार रुपये रोख आणि भव्य चषक देण्यात आले. याचा मान संजय पाटील यांच्या ‘कमलावती’ होडीने मिळवला. तर दुसरा क्रमांक आग्रावचे हरिश्चंद्र शेट्टी यांच्या ‘हिरकणी’ होडीने मिळवला. त्यांना 50 हजार रुपये आणि भव्य चषकाने सन्मानित करण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाचा 30 हजारांचा पुरस्कार आग्रावमधील हरिश्‍चंद्र जानपाटील यांच्या ‘जयवंती’ होडीने पटकावला.

- Advertisement -

हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

याशिवाय रेवदंडा येथील महेश पाटील व दिनेश मेस्त्री यांची वसुंधरा होंडी, आग्रावमधील अभिजीत अधिकारी व जयेंद्र वरसोलकर यांची लक्ष्मी होडी तसेच आग्रावमधील राजेंद्र अधिकारी यांची पद्मावती शिडाची होडी यांची उत्‍तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी आयोजक दर्यासागर मित्रमंडळाचे अध्यक्ष गोरख विश्‍वनाथ डोयले, उपाध्यक्ष दीपक जानू पाटील, सचिव जयवंत हरिश्ंचद्र बागवाले, खजिनदार राजेंद्र नारायण डोयले, तसेच पंचकमिटी विजय बाळाराम चोगले, संजय काशिनाथ डबे, रामदास बाळाराम चोगले, प्रभाकर चांगू लोदीखान, निकेश कमळाकर नाखवा, नथुराम अष्टमकर, चंद्रकांत किसन पाटील, रवींद्र रामभाऊ चोगले, महेंद्र विठ्ठल सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तर शेकापचे संदीप घरत, ओएनजीसी कंपनीचे पंकज शेट्टी, सुरेश खोत आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -