घरताज्या घडामोडीबाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..,शिवसेना-मनसे युतीचे शिंदे गटाकडून संकेत

बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..,शिवसेना-मनसे युतीचे शिंदे गटाकडून संकेत

Subscribe

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे आणि शिवसेनेतील शिंदे गट हे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही, असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले.

मुंबई महापालिकेत कुणाशी कशी युती होईल याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. राज ठाकरेंसोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. माझा राग विठ्ठलावर नाही, तर आजूबाजूच्या बडव्यांवर आहे, असं राज ठाकरेंनी पहिल्याचं भाषणात म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत, असं पावसकर म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जी भूमिका मांडली. ती भूमिका सर्वश्रूत आहे. आज इतक्या वर्षाने तोच प्रश्न उभा राहिला आहे. शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारे परंतु कार्यपद्धती वेगळी असणारे, दैवत आमचं एकच आहे. मात्र, आजूबाजूच्या बडव्यांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे बाहेर पडले, असं पावसकर म्हणाले.


हेही वाचा : सत्तासंघर्षावरील प्रकरणात उद्या सुनावणीची शक्यता, घटनापीठही स्थापन होणार?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -