घरमहाराष्ट्रसभ्य पोषाख असेल तरच मंदिरात प्रवेश; शिर्डी साई संस्थानचा निर्णय

सभ्य पोषाख असेल तरच मंदिरात प्रवेश; शिर्डी साई संस्थानचा निर्णय

Subscribe

शिर्डीत बाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने सार्वजनिक ठिकाणं तसेचं धार्मिक स्थळं देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र अनलॉक केल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धार्मिक स्थळांचे दार उघडून भाविकांना प्रवेश देण्यात आला. दरम्यान शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुलं करण्यात आले असून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसताय. शिर्डीमध्ये राज्य नाही तर परराज्यातील लोकं देखील दर्शनासाठी येत असतात. यासंदर्भातील फलक देखील मंदिर आवारात लावण्यात आले आहे.

त्यामुळे शिर्डीत बाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. तर ही सक्ती नसून संस्थांनाकडून भाविकांना सूचना करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार करण्यात आल्याने हा निर्णय घेतला, असे संस्थानकडून सांगण्यात आले आहे. देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते.

- Advertisement -

तिरूमल्ला येथील तिरूपती बालाजीच्या दर्शनांस जाणाऱ्या भाविकांना देखील ड्रेसकोड अनिवार्य असून पुरूषांना धोतर, लुंगी तर महिलांना साडी असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत. ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’, असे आवाहनही संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी भाविकांना केले आहे. तर इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत असणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत.


शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : निकालाचा नक्कीच परिणाम घडेल – देवेंद्र फडणवीस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -