घरताज्या घडामोडी५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शिवसैनिकांचा संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शिवसैनिकांचा संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

Subscribe

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला करण्यात आला. आमदार संतोष बांगर अमरावती येथील अंजनगाव सुर्जी येथे गेले असताना त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके असे नारे देखील दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष बांगर आज दुपारी ३ वाजता अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची माहिती तालुक्यातील शिवसैनिकांना लागली. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली.

- Advertisement -

संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीत असताना संतोष बांगर यांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती, परंतु विश्वासदर्शक ठरावावेळी भूमिका बदलून बांगर शिंदे गटात सामील झाले होते. शिंदे गटात दाखल होणारे ते शेवटचे आमदार होते.

हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची प्रतिक्रिया…

- Advertisement -

माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी नारेबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली.


हेही वाचा : मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणं कठीण, महापालिकेच्या जल अभियंता खात्याची खंत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -