काँग्रेस म्हणते…शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये!

युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये,' असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

Bandra government colony will transform said ashok chavan

महाविकास आघाडीमधील मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. त्यानंतर युपीएच्या अध्यक्षपदावरुन शिवसेनेने काँग्रेसला सल्ला दिला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ‘युपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे’. शिवसेनेने दिलेल्या या सल्ल्याला काँग्रसने प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्षपद देण्याचा मुद्दा शिवसेनेने मांडला होता. यावरुन काँग्रेसने शिवसेनेला सुनावले आहे. त्यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. ‘शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये,’ असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

तर आमच्यासाठी आनंदाची बातमी

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पण, मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. कारण शरद पवारांनीही हे वृत्त नाकारले आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण, जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत. तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही. आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु’.


हेही वाचा – सुशांतची हत्या की आत्महत्या? देशमुख यांचा सवाल