घरताज्या घडामोडी'तुमचे फक्त दोन तालुक्यांमध्येच राजकारण'; शिवसेना नेत्या दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

‘तुमचे फक्त दोन तालुक्यांमध्येच राजकारण’; शिवसेना नेत्या दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरू झालीये. तसंच, अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर विरोधकांडून टीका केली जाते आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरू झालीये. तसंच, अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर विरोधकांडून टीका केली जाते आहे. नुकताच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंचे फक्त दोन तालुक्यांमध्येच राजकारण आहे, असे दिपाली सय्यद यांनी म्हटले. तसेच, अयोध्येत दंगल झाल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांवर आघात झाल्यास तुम्ही काय कराल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“सध्या हिंदू-मुस्लिम आणि भोंग्याचे जे काही राजकारण सुरू आहे. तसंच, चलो अयोध्या असे नारे दिले जाताहेत. यावरून माझे राज ठाकरेंना एकच म्हणणे आहे की, त्यांचे फक्त दोन तालुक्यांमध्येच राजकारण आहे.”, असे दिपाली सय्यद म्हणाल्या. शिवाय, ‘जर तुम्ही अयोध्येत गेला आणि दंगल झाली आणि तुमच्या कार्यकर्त्यांवर आघात झाल्यास तुम्ही काय कराल?’, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांबाबत जे काय झाले त्यावेळी अमित ठाकरे गायब होते, असा टोलाही त्यांनी हाणत, या सर्व प्रकरणाची जबाबदारी तुम्ही घेणार का? असा सवाल उपस्थित केला. तसंच, ‘तुम्हाला भिती वाटतेय म्हणून तुम्ही इकडे तिकडे सभा घेत आहात. आता पुण्यात सभा घेत आहेत. या सभेत तुम्ही पुन्हा तेच बोलणार. तुम्ही काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण केली होती. त्यामुळे आता अयोध्येत जाण्यासाठी उत्तर भारतीयांची माफी मागू की नको मागू असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जा. शिवसेनेचा आजही अयोध्येत दरारा कायम आहे’, असा सल्ला त्यांनी दिला.

मनसेचे केवळ दोन तालुक्यांमध्येच राजकारण आहे, याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, कुठे आहेत मनसेचे आमदार? नेता कसा असला पाहिजे, त्याच्या हाताखालील कार्यकर्ते तगडे असले पाहिजेत. कुठेत मनसेचे आमदार आणि नगरसेवक. एका आमदारावर तुम्ही सगळ्या गोष्टी करता आहात. ऐवढे सोपे नसते. शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केतकी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण… – गोपीचंद पडळकर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -