घरमहाराष्ट्रविनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसेनेच्या खासदाराची शंका? केली चौकशीची मागणी

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसेनेच्या खासदाराची शंका? केली चौकशीची मागणी

Subscribe

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसेनेच्या खासदारांनी शंका व्यक्त केली आहे. त्यांचा अपघातीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मराठा सामाजेच नेते विनायक मेटे यांचे आजा पहाटे अपघाती निधन झाले. मुंबईत बैठकीसाठी येते असताना मुंबई- पुणे महामार्गावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे. विनायक मेटे यांना बैठकीसाठी अचानक कुणी बोलावले, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 शिवसेना खासदारांची चौकशीची मागणी –

- Advertisement -

यावेळी विनायक मेटेंचे अपघाती झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले. शिवरायांचे अरबी समुद्रात स्मारक उभे करणे आणि मराठा आरक्षण या दोन विषयांसाठी विनायक मेटे हे सातत्य़ाने आग्रही होते. असा माणूस अचानक रात्री बीडवरून निघतो काय अपघात होतो काय, नवे सरकार आले तेव्हा त्यांची चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गंभीर वाटते. म्हणून मी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतो. कोणी त्यांना बोलावले, काय झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाची अपघाताच्या चौकशीची मागणी –

- Advertisement -

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक मेटे यांच्या अपघातावरून प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाल्यानंतर २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. मदतीसाठी आजूबाजूला कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. हा अपघात होता की घातपात होता? याबद्दल आम्हाला शंका आहे. सरकारनं हे तात्काळ जाहीर करावं. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? ” असा प्रश्नही बाळासाहेब खैरे पाटील यांनी विचारला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -