घरताज्या घडामोडी'चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय'; ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

‘चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय’; ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील नेते मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील नेते मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. दरम्यान आता अंधेरीमध्ये पोट निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवलं. तसेच, शिवसेनेला नवीन चिन्हाचा आणि नावाचा वापर करण्यास सांगितले. यावरून आता शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला इशारा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून ठाकरेंनी हा इशारा दिला.

उद्धव ठाकरे यांच्या अनधिकृत ट्विटर खात्यावरून एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात ते दसरा मेळाव्याला संबोधित करताना दिसत असून त्याला ‘चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आता आगामी राजकीय लढाईसाठी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना खुले आव्हान दिल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि गटाला जोरदार झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत दोन्ही गटाला नव्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्याय दिला आहे. त्यामुळे आता ठाकरेंना आणि शिंदे गटाला कोणकोणते चिन्ह मिळणार या चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जिंकून दाखवणारच! चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -