घरताज्या घडामोडीऋतुजा लटकेंचा महापालिकेचा राजीनामा जाणूनबुजून मंजूर केला जात नाही; परबांचा शिंदे गटावर...

ऋतुजा लटकेंचा महापालिकेचा राजीनामा जाणूनबुजून मंजूर केला जात नाही; परबांचा शिंदे गटावर आरोप

Subscribe

अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या उमेदवारीसाठी महापलिकेतील सेवेचा राजीनामा देणे बंधनकारक असून, त्यांनी राजीनामा दिला.

अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या उमेदवारीसाठी महापलिकेतील सेवेचा राजीनामा देणे बंधनकारक असून, त्यांनी राजीनामा दिला. मात्र ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील सेवेचा राजीनामा जाणूनबुझून मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटातील अनिल परब यांच्याकडून करण्यात आला आहे. शिवाय, यामागे शिंदे गटाचे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (Shiv sena uddhav balasaheb thackeray party leader anil parab slams shinde group on andheri ramesh latke)

“माजी आमदार रमेश लटके यांच्या निधानंतर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. रमेश लटके शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. शाखाप्रमुख म्हणून त्यांनी अंधेरी येथे काम केले असून, तीन वॉर्डचे शाखाप्रमुख होते. शिवाय तीन टर्म नगरसेवक राहिले होते. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेना पक्षाने त्यावेळी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता”, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

- Advertisement -

“रमेश लटके यांच्या पत्नी महापालिकेच लिपीक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, ज्यावेळी त्यांना उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी २ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, निवडणूक झाल्यानंतर माझा राजीनामा मंजूर करावा. मात्र, ऋतुजा लटके यांच्या या राजीनाम्याला महापालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. एक महिना उलटल्यानंतर ज्यावेळी त्या राजीनामा घेण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा राजीनामा मंजूर करता येणार नाही. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला”, असेही त्यांनी सांगितले.

“राजीनामा देण्याच्या एक महिना अगोदर कळवावे लागते, जर एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक महिन्याचा पगार ट्रेझरीत द्यावा लागतो. त्यानुसार, त्यांनी एक महिना अगोदर कळवलेही होते. मात्र, महापालिकेकडून ते मान्य करण्यता आले नाही. दरम्यान, ऋतुजा लटके यांच्यावर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. त्यांचे महापालिकेत कसलेही ड्यू नाहीत. त्यांनी सर्व कागदपत्रे महापालिकेत सादर केली आहेत. पण महापालिका आयुक्त त्यांचा राजीनामा मंजूर करत नाहीत त्यांच्यावर तसा दबाव आहे. मी स्वतः तीन वेळा महापालिका अधिकाऱ्यांना भेटलो पण ते टाळाटाळ करत आहेत. हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांचा राजीनामा सहआयुक्तांकडेच मंजूर होतो”, असे अनिल परब यांनी म्हटले.

- Advertisement -

“सध्या फाईल फिरवण्याचा खेळ महापालिकेत सुरु आहे. माझी स्पष्ट मागणी आहे ऋतुजा लटके यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांना विविध प्रकारे शिंदे गट त्यांच्यावर दबाव टाकत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्यात. आमच्याकडूनच निवडणूक लढवाल तरच राजीनामा मंजूर होईल तसेच मंत्रीपदाचीही त्यांनी ऑफर देण्यात आल्याचे समजते. आता निवडणूक अर्ज भरायला केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं हा जो खेळ सुरु आहे त्यासाठी आम्ही शिंदे गटाचा निषेध करतो. यासाठी आता आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होईल”, असे अनिल परब यांनी म्हटले.


हेही वाचा – हवी ती किंमत देऊन भाजपाने शिवसेना फोडली, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -