घरताज्या घडामोडीभाजप नेत्यांच्या बेकायदा कारनाम्यांची चौकशी करा, आमदार सरनाईकांचे राज्यपालांना पत्र

भाजप नेत्यांच्या बेकायदा कारनाम्यांची चौकशी करा, आमदार सरनाईकांचे राज्यपालांना पत्र

Subscribe

भाजपच्या माजी खासदाराची पत्नी अध्यक्ष असलेल्या युवक प्रतिष्ठान संस्थेने मीरा भाईंदर तसेच एमएमआर क्षेत्रामध्ये कांदळवनाची कत्तल करुन बेकायदा शौचालये बांधली.

भाजप नेत्यांच्या ठाणे, भाईंदरमधील बेकयादा कारनाम्यांची चौकशी करा अशी मागणी करणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. सरनाईक यांच्या छाबय्या इमारतीचा कोट्यावधीचा कर राज्य सरकारने माफ केला आहे. याविरोधात आणि भायखळामधील राणी बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या निविदांमध्ये १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर आता आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा राज्यपालांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

छाबय्या इमारतीचा राज्य सरकारने दंड माफ केल्यामुळे भाजप नेत्यांनी पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पंरतु त्याच भाजप नेत्यांचे ठाणे आणि मीरा भाइंदरमध्ये बेकायदा कारनामे केले आहेत. याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे.

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रातून भाजप नेत्यांचा बुरखा फाडला आहे. भाजपचे काही नेते माझ्याविरोधातील कारवाईची मागणी करत आहेत. परंतु जर त्यांच्या तक्रारीची दखल घेणार असाल तर कोणताही मुलाहिजा न ठेवता माझ्या पत्राचीही गंभीर दखल घेण्यात यावी असे सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

सरनाईकांच्या पत्रातील मुद्दे

विधिमंडलातील सदस्य असलेल्या भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने ठाण्यातील वैतीवाडी या झोपडपट्टी विकास प्रकल्पामध्ये आपल्या झोपड्या आहेत असे भासवले. तसेच एका इमारतीमध्ये विकासकाला दमबाजी करुन भलेमोठे घर लाटले आहे.

- Advertisement -

भाजप आमदाराने पदाचा गैरवापर करुन धाकट्या भावासाठी बीओटी तत्त्वावर तरण तलाव घेतला. त्यामध्ये पाणी चोरी करुन महापालिकेचे उत्पन्न घटवलं आहे.

खोपट येथील फ्लॉवर व्हॅली या इमारतीच्या तळघरात अनेक वर्षांपासून याच आमदाराच्या भावाची अनधिकृत जीम आहे.

भाजपच्या माजी खासदाराची पत्नी अध्यक्ष असलेल्या युवक प्रतिष्ठान संस्थेने मीरा भाईंदर तसेच एमएमआर क्षेत्रामध्ये कांदळवनाची कत्तल करुन बेकायदा शौचालये बांधली.


हेही वाचा : शिवसेना सत्तेसाठी लाचार ! कॉंग्रेस नेतृत्वाचे बाळासाहेबांच्या जयंतीला एक ट्विटही नाही- देवेंद्र फडणवीस

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -