घरपालघरतारापूर एमआयडीसीतील मैदान वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट

तारापूर एमआयडीसीतील मैदान वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट

Subscribe

तारापूर एमआयडीतीतील मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका कंपनीला विकण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

तारापूर एमआयडीतीतील मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका कंपनीला विकण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. हे मैदान वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट झाली असून आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मैदान बचाव आंदोलनाचा नारा देण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्र. ओ.एस. ४६/२ धारण करणारा भूखंड हा खेळाच्या मैदानासाठी प्रस्तावित आहे. भूखंड हा ५१ हजार ३१९ चौ. मी. होता. २०१० व २०१५ मध्ये हा भूखंड डी डेकोर कंपनीला एमआयडीसीमार्फत विक्री करण्यात आला होता. त्याविरोधात खैरापाडा, बोईसर, सरावली आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी, अनेक सामाजिक संस्थांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी मोठे जनआंदोलन उभे केले होते. त्याचे फलित म्हणून ३४३१९ चौ. मी. इतके क्षेत्र डी डेकोर कंपनीला देवून उर्वरित १७००० चौ. मी. क्षेत्र मैदानासाठी आरक्षित केले होते. विशेष म्हणजे तेव्हाही उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. त्यांनीच जन भावनेचा आदर करून मैदान आरक्षणाचे आदेश दिले होते.

मात्र, मैदानासाठी आरक्षित भूखंड डी डेकोर कंपनीला एमआयडीसीमार्फत विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरामध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. भूखंड हा बोईसर परिसराचा आत्मा आहे. प्रदूषणाच्या सर्व हद्दी पार केलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील मोकळा श्वास घेण्यासाठी हे एकमेव मैदान शिल्लक आहे. येथे रोज हजारो तरूण खेळांच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ राखत आहेत. असे असताना येथील भुमिपुत्राच्या भावनांचा कोणताही विचार न करता हा भूखंड डी डेकोर कंपनीला विकला.

- Advertisement -

भूखंडावरील मैदान वाचवण्यासाठी परिसरातील सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. चर्चेच्या दरम्यान एमआयडीसीचे अधिकारी मंत्री देसाई यांना चुकीची माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमदार पाटील यांनी मंत्री देसाई यांच्यासमोरच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर लवकरच एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीबरोबर बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले. आदिवासी एकता परिषद भुमीसेनेचे काळूराम धोदडे, जिल्हा परिषद पालघर बांधकाम समिती सभापती शीतल धोडी, शिवसेनेचे कुंदन संखे, निलम संखे, मुकेश पाटील, भाजपचे अशोक वडे, प्रशांत संखे, बहुजन विकास आघाडीचे नितीन भोईर, खैरेपाडा ग्रामपंचायत सरपंच भावना धोडी, उपसरपंच हितेश संखे, उपसरपंच विवेक वडे, सचिन लोखंडे, मोहन म्हात्रे आणि ग्रामपंचायत सदस्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

हेही वाचा –

भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -