घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ; राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ; राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

'मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे', अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

‘मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे’, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिवाय, ‘मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं जातं’, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला. (Shivsena Ubt Mp Vinayak Raut Challenge Eknath Shinde Over Savarkar Bharatratna Delhi Maharashtra)

नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. यावरून ‘जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल’ असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिले. त्यानुसार, “आम्हाला जमालगोटा देण्याचं सोडा, रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची सभा झाली. या सभेतून लोक निघून गेले, त्यावर दृष्टी फिरवली, तर लोकांत आपलं स्थान किती, हे कळलं असतं. एकनाथ शिंदेंनी लक्षात ठेवावं, सावरकरांचा जयघोष करण्याचा ठेका फक्त भाजपाने घेतला नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचे प्रथम स्मारक शिवतीर्थ येथे केलं”, अशीही टीका विनायक राऊत यांनी केली.

- Advertisement -

“दिल्लीत सावरकरांची जयंती केली म्हणून, एकनाथ शिंदे मोठे भक्त झाले, असे नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना भेटून सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यास सांगावे”, असे आव्हान विनायक राऊतांनी एकनाथ शिंदे यांना दिले. शिवाय, “एकनाथ शिंदेंचा बुद्धीभ्रंश झाला आहे. विरोधकांचा बहिष्कार नवीन संसद भवनाला नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते, तर काय नुकसान झाले असते. दुर्दैवाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना निमंत्रण सुद्धा नाही”, असेही विनायक राऊत म्हणाले.


हेही वाचा – वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी अहिल्यादेवी-क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे पुतळे हटवले, ‘हे महाराष्ट्र शासनाला शोभते का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -