घरमहाराष्ट्रगिरगाव, डोंबिवलीत तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेषात शोभायात्रा गजबजल्या

गिरगाव, डोंबिवलीत तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेषात शोभायात्रा गजबजल्या

Subscribe

Gudhipadwa 2023 | सकाळी सात वाजल्यापासून चापून चोपून नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर फेटा बांधून अनेक तरुणी बुलेटसवारीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर, तरुणांनीही फेटा, धोतर, सदरा परिधान करून मुंबईच्या रस्त्यांवर चैतन्याची नवी अनुभूती दिली आहे.

Gudhipadwa 2023 | मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध शहरांत शोभायात्रांना उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. गिरगाव, डोंबिवलीसारख्या पारंपरिक शोभायात्रांमध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह दिसून येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून चापून चोपून नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर फेटा बांधून अनेक तरुणी बुलेटसवारीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर, तरुणांनीही फेटा, धोतर, सदरा परिधान करून मुंबईच्या रस्त्यांवर चैतन्याची नवी अनुभूती दिली आहे.

मुंबईतील गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा निघाली आहे. मुंबईतील ही सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी शोभायात्रा असल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण येथे येत असतात. तसंच, डोंबिवलीतील फडके रोडवरील शोभायात्राही तितकीच प्रसिद्ध आहे. सर्वांत जुनी शोभायात्रा म्हणून डोंबिवलीकडे पाहिलं जातं. मुंबईच्या बाजूला असलेल्या डोंबिवली हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे या सांस्कृतिक शहरातील विचारी, रसिक आणि पारंपरिक विचारधारेचे लोक एकत्र येत येथे शोभायात्रेत सहभागी होत असतात.

- Advertisement -


गुढीपाडवा या सणापासून हिंदू नव वर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 22 मार्च 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जातआहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभुषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो.

- Advertisement -

गुढीपाडवा शुभ मुहूर्त

यंदा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू झाला असून  आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 8:20 वाजता समाप्त होईल. तसेच गुढीच्या पूजेसाठी सकाळी 6:29 ते 7.39 पर्यंतची वेळ शुभ असेल.

अशा पद्धतीने साजरा केला जातो गुढीपाडवा

मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. यासाठी उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी अथवा नवी कोरी साडी बांधतात. यावर चांदीचा अथवा तांब्याचा गडू उपडा घालतात. त्यावर कडूलिंबाची दहाळी व आंब्याची पाने व साखरेच्या गाठी फुलांचा हार गुढीला चढवतात. व घराबाहेरील एका उंच ठिकाणी गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात.


हेही वाचा :

Vastu Tips : घरात सतत आजारपण सुरु आहे? ‘हे’ वास्तू दोष आजचं करा दूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -